Independence Day | देशभक्तीच्या भावनेसह लष्कराच्या दक्षिण कमांडने साजरा केला 78 वा स्वातंत्र्यदिन

Southern Command

पुणे : Independence Day | पुण्यातील दक्षिण कमांडच्या मुख्यालयाने देशभक्तीच्या भावनेसह, राष्ट्राचा समृद्ध वारसा आणि सैनिकांचे शौर्य अधोरेखित करणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. याप्रसंगी सदर्न कमांडचे प्रमुख, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल धीरज सेठ (अति विशिष्ट सेवा पदक प्राप्त) तसेच सर्व श्रेणीतील अधिकारी, जवान आणि माजी सैनिकांनी कमांड युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. (Southern Command)

राष्ट्रीय एकात्मता आणि देशाभिमान दर्शविणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ मोहीमेचा भाग म्हणून 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवात राष्ट्रध्वजाचे उत्साही प्रदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे औचित्य साधत, ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेवर आधारित सरकारच्या धोरणाअंतर्गत वृक्षारोपण मोहीम सुरू केली.आर्मी कमांडर आणि इतर अधिकाऱ्यांनी पुण्यातील कॅन्टोन्मेंटमध्ये रोपटे लावली. हे वृक्षारोपण हरित पृथ्वीसाठी भारतीय सैन्याची बांधिलकी दर्शवते. दक्षिण कमांडमधील लष्कराच्या तुकड्या, आणि आस्थापनांनी फळे देणारी तसेच औषधी वनस्पतींसह विविध प्रकारच्या एक लाखाहून अधिक रोपांची लागवड केली.

कारगिल विजय दिवसानिमित्त मुंबईतील कुलाबा येथून सुरू झालेल्या मोटारसायकल मोहिमेच्या ‘फ्लेगिंग इन’ समारंभाने या उत्सवाचा समारोप झाला. देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या मोहिमेने मुंबई ते कारगिल आणि पुढे पुणे असे विविध राज्यांतून 5500 किमीचे अंतर कापले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Flyover | अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले – ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले असे आमचे सरकार’

Hadapsar Pune News | हडपसर: बहुचर्चित भारतातील सर्वात पहिल्या प्रभू श्रीरामांच्या पूर्णाकृती शिल्पाचे मुख्यमंत्र्याचा हस्ते होणार उद्घाटन !

Pune ACB Trap Case | महिला सहायक सरकारी वकिल एसीबीच्या जाळ्यात; जप्त कार परत मिळवून देण्यासाठी मागितली लाच

Sri Sri Ravi Shankar | वैचारिक अभिव्यक्ती आणि विविधता हेच भारताला भारत बनवते ! – गुरुदेव श्री श्री रविशंकर