IndianOil UTT Season 6 | इंडियनऑइल यूटीटी सीझन 6: पीबीजी पुणे जॅग्वार्सचा दणदणीत विजय; कोलकाता थंडरब्लेड्सवर 10-5 अशी मात

PBG Pune Jaguars

या हंगामातील सर्व 23 सामने स्टार स्पोर्ट्स खेल आणि स्टार स्पोर्ट्स 2 तमिळवर प्रसारित केल्या जातील आणि जिओहॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केल्या जातील.

अहमदाबाद : पीबीजी पुणे जॅग्वार्सने (PBG Pune Jaguars) इंडियनऑइल यूटीटी सीझन ६ च्या लढतीत कोलकाता थंडरब्लेड्सचा १०-५ असा पराभव केला. यूटीटीच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स खेल आणि स्टार स्पोर्ट्स २ तमिळवर प्रसारित केले जातील आणि देशभरातील चाहत्यांसाठी जिओहॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केले जातील. (IndianOil UTT Season 6)

टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (टीटीएफआय) च्या नेतृत्वाखाली आयोजित आणि निरज बजाज व विटा दानी यांनी प्रमोट केलेले, इंडियनऑइल यूटीटी एक प्रमुख व्यावसायिक लीग म्हणून वाढत आहे. १६ दिवसांत, सर्व २३ सामने अहमदाबादच्या EKA Arena येथे होतील आणि तिकिटे फक्त बुकमायशोवर उपलब्ध असतील. (Punit Balan Group-PBG)

अल्वारो रोबल्सने आंतरराष्ट्रीय हेवीवेट्स आणि इंडियनऑइल यूटीटीच्या दिग्गज खेळाडूंमधील एका रोमांचक लढतीत क्वाद्री अरुणाला हरवून पीबीजी पुणे जॅग्वार्सला आदर्श सुरुवात करून दिली. त्याने तीनही गेम गोल्डन पॉइंट्सवर जिंकून हंगामातील त्याचा पहिला एकेरी विजय मिळवला. एकाच इंडियनऑइल यूटीटी मोहिमेत दोनदा असा दुर्मिळ पराक्रम पहिल्यांदाच घडला. त्यानंतर दिना मेश्रेफने अॅड्रियाना डियाझवर २-१ असा जोरदार विजय मिळवला आणि तिचा पहिल्या लीग विजयाची नोंद केली. अनिर्बान घोषसोबत जोडीने मिश्र दुहेरीत २-१ असा विजय मिळवून पुण्याला सामन्यावर लवकर नियंत्रण मिळवून दिले.

कोलकाता थंडरब्लेड्सने युवा स्टार अंकुर भट्टाचार्जीच्या सहाय्याने प्रत्युत्तर दिले, ज्याने दुसऱ्या पुरुष एकेरीत अनिर्बानला पराभूत केले. अनिर्बनने अंतिम गेम जिंकून अंकुरला पूर्ण स्वीप देण्यापासून रोखले. हा एक महत्त्वाचा गुण होता ज्यामुळे पुणे पुढे राहिले आणि कोलकाताला बरोबरी साधण्यापासून रोखले. त्यानंतर रीथ रिश्याने सेलेना सेल्वाकुमारला ३-० असे हरवून बरोबरी साधली.

अंतिम स्कोअर

पीबीजी पुणे जॅग्वार्स वि. वि. १०-५ कोलकाता थंडरब्लेड्स

अल्वारो रोबल्स वि. वि. क्वाद्री अरुणा २-१ ( १०-११, ११-१०, ११-१०)

दिना मेश्रीफ वि. वि. ॲड्रियाना डायझ २-१ (११-८, १-११, ११-१०)

अनिर्बन घोष/दीना मेश्रेफ वि. वि. अंकुर भट्टाचार्जी/एड्रियाना डायझ २-१ ( ११-९, ११-९ , ७-११)

अनिर्बन घोष पराभूत वि. अंकुर भट्टाचार्जी १-२ ( ८-११, ७-११, ११-८ )

रीठ रिश्या वि. वि. सेलेना सेल्वाकुमार ३-० (११-९, ११-८, ११-८)

अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) बद्दल

२०१७ मध्ये अल्टिमेट टेबल टेनिस (UTT) ही भारतातील प्रमुख फ्रँचायझी-आधारित टेबल टेनिस लीग सुरू झाली. ही लीग नीरज बजाज आणि विटा दानी यांनी टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) च्या संयुक्त विद्यमाने प्रमोट केली आहे. आज, UTT ही आठ संघांची स्पर्धा आहे ज्यामध्ये ४८ जागतिक दर्जाचे खेळाडू प्रतिष्ठित जेतेपदासाठी लढत आहेत. ही लीग भारत आणि जगभरातील अव्वल खेळाडू आणि प्रशिक्षकांना आकर्षित करत आहे. या खेळाडूंमध्ये ऑलिंपिक, आशियाई आणि राष्ट्रकुल खेळातील पदक विजेते आहेत. UTT राष्ट्रीय रँकिंग स्पर्धा, टेबल टेनिस सुपर लीग प्रायोजित करून आणि देशातील WTT स्पर्धांचे सह-आयोजित करून देखील या खेळाला प्रोत्साहन देते. प्रत्येक आवृत्तीसह, UTT जागतिक टेबल टेनिसमधील प्रमुख स्पर्धा म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे, खेळाची प्रतिष्ठा उंचावत आहे आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

You may have missed