Indias Digital Boom | स्मार्टफोन्सच्या सहाय्यानं 80 कोटी भारतीय गरिबीतून बाहेर; भारताच्या डिजिटल क्रांतीचे कौतुक थेट संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत
नवी दिल्ली – Indias Digital Boom | मागील पाच ते सहा वर्षांत स्मार्टफोनच्या सहाय्याने भारतातील 80 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर पडणे शक्य झाले आहे, असे महत्वाचे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी केले आहे. वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी भूकेचा प्रश्न सोडविण्याच्या दिशेने प्रगतीचा वेग या विषयावर बोलत असताना फ्रान्सिस यांनी डिजिटायलायझेशनमुळे भारताच्या ग्रामीण भागाचा कसा विकास झाला, ते सांगितले.
डेनिस फ्रान्सिस म्हणाले, आज ग्रामीण भागातील लोकही डिजिटल बँकिंग पेमेंट प्रणाली वापरून अतिशय सोप्या पद्धतीने व्यवहार करू शकत आहेत. स्मार्टफोनमुळे हे अगदी सोपे झाले आहे. भारतात आता इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. भारताच्या तुलनेत इतर जागतिक दक्षिण देशांनी (ग्लोबल साऊथ) या दिशेने भारताऐवढे प्रयत्न केलेले नाहीत. भारताने मात्र डिजिटलायझेशनमध्ये आघाडी घेतली.
ते म्हणाले, भारताच्या ग्रामीण भागातील जनता यापूर्वी बँकिंग व्यवस्थेशी जोडली गेली नव्हती. मात्र आज ते स्मार्टफोनच्या माध्यमातून आपले व्यवहार करत आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातूनच बिलाचे पैसे दिले जातात आणि पेमेंट स्वीकारले जाते. यामुळेच भारतात इंटरनेटचा वापर वाढला असून आर्थिक व्यवहारांसाठी त्याचा सकारात्मक वापर होत आहे.
फ्रान्सिस यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागच्या दहा वर्षांत डिजिटलायझेशनवर अधिक लक्ष केंद्रीत केले गेले.
2016 साली 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर डिजिटल व्यवहारांनी गती घेतली.
यामध्ये युपीआय व्यवहारांचा मोठा हातभार आहे. पंतप्रधान मोदी यांनी जेएएम जन धन,
आधार आणि मोबाइल ही योजना आणून डिजिटलायझेशनला वेग दिला.
अशाप्रकारे भारतात झालेल्या डिजिटल क्रांतीचे गोडवे थेट संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत गायले गेले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा