Indrajit Sawant-Tiger Claws | वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; वडेट्टीवारांची सरकारवर टीका, म्हणाले…

Vijay Wadettiwar

मुंबई : Indrajit Sawant-Tiger Claws | लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे असलेली वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्टीकरण म्युझियम पत्राद्वारे कळविले असल्याचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटले आहे. या संदर्भात मी विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याकडून माहिती मागवली असता, त्यांच्याकडून लिखित स्वरूपात सांगण्यात आले की, म्युझियमकडे ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा नाही.

याबाबत कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी खळबळजनक माहिती दिली आहे. ते म्हणाले, ” व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन येथून भारतात आणली जाणारी वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. या संदर्भात व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम यांच्याशी माझा पत्र व्यवहार झाला आहे. या पत्रात देखील वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे म्युझियम कडून सांगण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र सरकार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवभक्तांची फसवणूक करू नये, असे परखड मत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्यक्त केले आहे.

यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, ” व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने जे पत्र पाठवले आहे त्यामुळे संशय निर्माण झाला आहे.
ती वाघनखं ओरिजनल आहेत का? याबाबत आम्ही माहिती देऊ शकत नाही असे सांगण्यात आले आहे.
गाजावाजा करून वाघनखांच्या संदर्भात जी भूमिका मांडली त्याला या पत्रामुळे धक्का बसला आहे.
तसेच या संदर्भाने सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. या सरकारने दिखाऊपणा केलेला आहे.
जनतेच्या पैशाचा अपव्यय केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चाललेल्या लोकांच्या भावनेशी सरकार खेळत असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान