Infosys GST Evasion Issue | इन्फोसिसला आलेल्या जीएसटी नोटीसमुळे भडकले मोदी समर्थक उद्योगपती, म्हणाले – ‘हा टॅक्स टेररिझम…’
नवी दिल्ली : Infosys GST Evasion Issue | देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचे नाव पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. इन्फोसिसला टॅक्स डिपार्टमेंटने 32 हजार कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीच्या प्रकरणात नोटीस धाडली आहे. मात्र कंपनीने दावा केला की, त्यांनी सर्व थकबाकी भरली आहे. दरम्यान हा मुद्दा कॉर्पोरेट जगतात चर्चेचा विषय झाला आहे, इन्फोसीसशी संबंधीत उद्योगपती या प्रकारावर टीका करत आहेत. (Infosys GST Evasion Issue)
जीएसटी डिपार्टमेंटने का पाठवली नोटीस
इन्फोसिसला जीएसटी डिपार्टमेंटने एक टॅक्स नोटीस पाठविण्यात आली आहे, ज्यामध्ये 32,403 कोटी रुपयांच्या थकबाकीची मागणी करण्यात आली आहे. नोटीसमध्ये म्हटले आहे की, टॅक्सची मागणी इन्फोसिसने आपल्या परदेशी शाखांकडून घेतलेल्या सेवेबाबत आहेत, जी 2017 पासून 2022 च्या दरम्यानची आहे.
इन्फोसिसने त्या सेवांच्या बदल्यात आपल्या परदेशी शाखांना पेमेंट केले आहे आणि ते खर्च म्हणून दाखवले आहे. यामुळे कंपनीवर रिव्हर्स चार्ज मॅकेनिझम अंतर्गत 32,403.46 कोटी रुपयांच्या एकात्मिक जीएसटीचे दायित्व आहे.
कोणतेही दायित्व नाही – इन्फोसिस
नोटीसनंतर इन्फोसिसने शेयर बाजाराला या प्रकरणी आपली माहिती दिली आहे. यात म्हटले आहे की, आमच्यावर कोणतेही दायित्व नाही. आम्ही जीएसटीची सर्व बाकी आधीच भरली आहे. कंपनी या प्रकरणात राज्य आणि केंद्राच्या सर्व नियमांचे योग्य प्रकारे पालन करत आहे. या प्रकरणात आमच्यावर कोणत्याही प्रकारचे कर दायित्व नाही.
इन्फोसिसच्या नोटीसवर भडकले मोहनदास पै
पद्मश्रीने सन्मानित उद्योगपती टी. व्ही. मोहनदास पै यांनी एक्सवर प्रतिक्रिया व्यक्ती करताना पंतप्रधान कार्यालय, पीएम नरेंद्र मोदी, अर्थ मंत्रालय आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना टॅक करत ही बातमी खरी असेल तर ही वाईट घटना आहे आणि टॅक्स टेररिझमचे सर्वात वाईट प्रकरण आहे.
भारतातून सर्व्हिस एक्सपोर्ट करणार्या कंपन्यांना जीएसटी लागत नाही. कर अधिकार्यांना त्यांनी प्रश्न केला की, अधिकारी आपल्या मनाने गोष्टींची कोणतीही व्याख्या करू शकतात का? असे पै यांनी म्हटले आहे.
मोहनदास पै यांच्या पोस्टला कोट करत अशनीर ग्रोवर यांनी म्हटले की, जीएसटीवाल्यांनी यापूर्वी आयव्हीएफ सेंटर्सला सुद्धा टॅक्स नोटी पाठवली आहे. त्यांना वाटत होते की- आयव्हीएफ सेंटर मेडिकल सर्व्हिसच्या कक्षेत येत नाहीत, कारण रूग्णाची स्थिती उपचारानंतर सुद्धा पहिल्यासारखीच राहते. मध्येच मुल झाले तर काय करायचे.
दरम्यान, इन्फोसिसला नोटीस आल्यानंतर कंपनीच्या शेयरवर त्याचा परिणाम झाला आहे.
आज गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात इन्फोसिसचा शेयर 0.55 टक्के घसरला आणि 1,860 रुपयांच्या खाली
आला होता. देशभरातील शेयरमध्ये तेजी असताना हा शेयर घसरला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune News | दोन वर्षाचा आमोद पावसाच्या पाण्यात बुडाला; डॉक्टरांनी ‘सीपीआर’ दिला अन् तो वाचला!
Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले?
आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”
Pune ACB Trap Case | गुन्हा दाखल करण्यासाठी 2 लाखांची लाच मागून 1 लाख 70 हजार रुपये घेताना
पोलिस हवालदार जाळ्यात
Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर