INS Shivaji Lonavala | लोणावळा : ‘आयएनएस शिवाजी’ येथे हवालदाराची गोळी झाडून आत्महत्या

लोणावळा : INS Shivaji Lonavala | लोणावळा जवळ असलेल्या नौदलाच्या ‘आय एन एस शिवाजी’ येथे हवालदाराने (Havaldar Suicide Case) स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.12) दुपारी घडली आहे. हरेंद्र सिंग असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव असून ते डीआरडीओ येथे कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, हरेंदर् सिंग हे डीआरडीओ येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. अति सुरक्षित समजल्या जाणाऱ्या लोणावळा जवळ नौदलाचे ‘आयएनएस शिवाजी’ हे केंद्र आहे. या ठिकाणी जाऊन हरेंद्र यांनी पिस्तुलातून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. (INS Shivaji Lonavala)
हरेंद्र सिंग हे ‘आयएनएस शिवाजी’ येथे काय करत होते. तसेच त्यांच्याकडे पिस्तुल कसे आले, याबाबत तपास सरु आहे.
हरेंद्र यांनी कौटुंबिक कारणावरुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सिंग हे पिस्तूल घेऊन कसे गेले आणि त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास आता सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी
तसेच पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) यांच्याकडून सुरू झाला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड