Instagram Love Story | पंजाबच्या तरुणीचं रत्नागिरीच्या तरुणाशी इन्स्टावर प्रेम जडलं; पंजाबवरून रत्नागिरी गाठली अन्…

Instagram Love Story

रत्नागिरी : Instagram Love Story | आभासी जगातील प्रेम नेमकं काय असतं? त्याचे काय परिणाम भोगावे लागतात, याबाबत आपण सातत्याने घटना पाहात असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. पंजाबमध्ये बारावीत शिकणाऱ्या अंशू नावाच्या १८ वर्षीय तरुणीचे इन्स्टावर रत्नागिरीच्या तरुणाशी प्रेम जडलं, हळूहळू नंबर एक्सचेंज झाले. व्हॉईल कॉलिंग सुरू झाली. (Ratnagiri Crime News)

या तरूणाने आपलं नाव हर्षकुमार यादव असे सांगितले. तसेच तो रत्नागिरी येथे राहत असून त्यांच्या बाबांचा व्यवसाय असल्याचे देखील सांगितले. संवाद वाढत गेला. प्रेम बहरत गेले. गोष्टी अगदी लग्नापर्यंत गेल्या. पण, घोडं काही पुढं जात नव्हते.

एके दिवशी या हर्षकुमार यादवने घरच्यांची आपल्या लग्नाला परवानगी मिळाल्याचं सांगितले. त्यानंतर लग्नासाठी रत्नागिरीला बोलावून घेतले. प्रेमात आकांत बुडालेल्या अंशूने थेट रत्नागिरी गाठले. विषेश बाब म्हणजे या प्रवास खर्चासाठी हर्षकुमारने तिला पैसे देखील पाठवले. प्रवासादरम्यान तुझं सीम कार्ड फेकून दे असंदेखील सांगितले. त्याच्या प्रेमासाठी तिने तेदेखील केले. त्यानंतर कुणाचा तरी हॉटस्पॉट घेऊन त्याच्याशी संपर्क केला. पण, रत्नागिरीला पोहोचल्यानंतर अवघ्या काही तासात तरूणीला आपली फसवणूक झाल्याची बाब ध्यानात आली.

तरुणीने या प्रसंगाबाबत माहिती देताना सांगितले की, मोठा प्रवास करत रत्नागिरी स्टेशनला उतरले. त्याने मला तुला नेण्यासाठी रत्नागिरी स्टेशनला गाडी पाठवत असल्याचे सांगितले. पण स्टेशनला उतरल्यानंतर गाडी देखील दिसली नाही. मी त्याला सातत्यानं संपर्क करत राहिले. पण, प्रतिसाद मिळत नव्हता. इन्स्टावर मेसेज केले. व्हॉईस कॉल केले. पण प्रतिसाद नाही. अखेर एक कॉल उचलला गेला. पण कुणीतरी मुलगी बोलत होती.

हा नंबर हर्षकुमार यादवचा नसून तो रिझानचा आहे. पुन्हा या नंबरवर कॉल करायचा नाही असं सांगत समोरच्या मुलीनं फोन ठेवला.
माझ्या पायाखालची वाळू सरकरली. काय करू कळेना.
अखेर नोकरी करून पैसे कमवायचे आणि पुन्हा घरी परतायचं या इराद्यानं दुकानांमध्ये नोकरीचा शोध सुरू केला.
त्यावेळी माबोईल दुकानदारामध्ये नोकरी मागत असताना त्यांना सारी गोष्ट सांगितली. त्यांनी पोलिसांना बोलावलं आणि मला मोठी मदत झाली.

मी आता परत घरी जात असल्याचे समाधान आहे.
पुन्हा कधीच अशा प्रकारे फसणार नाही. मला शिकून मोठं व्हायचे आहे.
न्यायमूर्ती बनायचे आहे. आई- बाबांचं नाव मोठं करायचे आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

You may have missed