International Floriculture and Horticulture Exhibition In Pune | जागतिक दर्जाचे हॉर्टीकल्चरचे प्रदर्शन पाहण्याची पुणेकरांना सुवर्णसंधी ! आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती प्रदर्शनाचे आयोजन

Subhas Chandrakant Jagtap

21 ते 24 नोव्हेंबर रोजी नवीन कृषी  महाविद्यालय मैदान (सिंचनगर) येथे पार पडणार

पुणे : International Floriculture and Horticulture Exhibition In Pune | वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटी (Vasu’s Events & Hospitality) व महाराष्ट्र नर्सरीमेन असोसिएशन (Maharashtra Nurserymen Association-MNA) यांच्यावतीने भारतातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय फुलोत्पादन बागायती, फ्लोरीकल्चर, आर्बोरीकल्चर, ॲग्रीप्रेन्योरशिप आणि प्रगत प्रक्रिया तंत्रज्ञानवरती प्रदर्शनाचे आयोजन २१ ते २४ नोव्हेंबर रोजी नवीन कृषी महाविद्यालय मैदान (सिंचगर) येथे पार पडणार आहे. याचे उद्घाटन २१ नोव्हेबर रोजी सकाळी ११.०० वा. सीमा सुरक्षा दलाचे उपायुक्त राजा बाबू सिंग, यांच्या शुभहस्ते पार पडणार असून यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक विजय बोत्रे, पुणे पुलाच्या संस्थापक सोनिया कोंजेटी, निबे डिफेन्सचे संचालक गणेश निबे आणि यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊरचे चेअरमन सुभाष चंद्रकांत जगताप हे असणार आहेत.

सदरील हॉर्टिकल्चर प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तसेच गार्डनिंग क्षेत्रातल्या अधिक नवनवीन गोष्टी बघायला मिळणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रातील देशातील आणि परदेशातील शेतकरी, व्यावसायिक प्रदर्शनात सहभागी होणार असून या वेळी हॉर्टिकल्चर तज्ञ हे शेतकरी आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हॉर्टिकल्चर क्षेत्रामध्ये रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

पुण्यात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत वसू इव्हेंट आणि हॉस्पिटॅलिटीचे वसंत रासने,  महाराष्ट्र नर्सरी मेन असोसिएशन अध्यक्ष शशिकांत चौधरी, सेक्रेटरी आनंद कांचन, मनोज देवरे, अशोक भुजबळ, राजेंद्र चव्हाण, सुनील चोरगे, महिपाल राणा, नेहा त्यागी असे मान्यवर उपस्थित होते. सदरील प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार असून सकाळी १० ते ७ पर्यंत पुणेकरांना पाहता येणार आहे. तरी जास्तीतजास्त पुणेकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed