IPS Rajendra Dahale | विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपतीचे उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस पदक
पुणे : IPS Rajendra Dahale | विशेष पोलीस महानिरीक्षक व महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे संचालक डॉ. राजेंद्र डहाळे यांना राष्ट्रपतीचे उल्लेखनीय सेवेबाबतचे पोलीस पदक जाहीर झाले आहे.
डॉ. डहाळे यांना यापूर्वी नंदूरबार पोलीस अधीक्षक पदावर असताना १५ ऑगस्ट २०१७ रोजी राष्ट्रपतीचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पोलीस पदक जाहीर केले होते. डॉ. डहाळे यांना त्यांचे ३१ वर्षाचे सेवेमध्ये उत्कृष्ठ सेवेबद्दल दोन वेळा पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविले आहे.
पुणे शहर पोलीस दलात सायबर गुन्हे पोलीस उपायुक्त असताना डॉ. राजेंद्र डहाळे यांनी सायबर फॉरेन्सिक लॅबची निर्मितीमध्ये प्रमुख भूमिका बजावली होती. त्याबद्दल पोलीस आयुक्तांनी त्यांचा गौरव केला होता.
तसेच पुणे शहरात अपर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना गणेश उत्सव व
इतर वेळी त्यांनी कायदा व सुव्यवस्था उत्कृष्ठपणे ठेवण्याबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी त्यांचा सन्मान केला आहे.
डॉ. डहाळे यांनी यापूर्वी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग व इतर विभागात उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर