IPS Shivdeep Lande | आयपीएस शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, राजकीय प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम, आता मोठी जबाबदारी

मुंबई : IPS Shivdeep Lande | महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी काही दिवसांपूर्वी बिहार येथे अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. शिवसेना शिंदे गटाचे नेते (Shivsena Shinde Group), माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांचे ते जावई आहेत.
https://www.instagram.com/p/DBA0znWCVw3
दरम्यान, आयपीएस लांडेंचा राजीनामा स्वीकारण्यात न आल्याने त्यांना बिहार राज्यातच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आता त्यांची बदली करण्यात आली असून त्यांना पोलीस महानिरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. बिहार राज्यातील पाटणा पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
https://www.instagram.com/p/DBA4OSeJXKv
लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे डीआयजी म्हणून काम केले आहे. आता, त्यांच्याकडे बिहार राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार देण्यात आला आहे. बिहारच्या गृह विभागाने त्यांच्या बदलीचे पत्रही जारी केले आहे.
https://www.instagram.com/p/DBA2jpoJCg3
शिवदीप लांडे यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या राजकीय श्रीगणेशाची सुद्धा चर्चा रंगली होती. मात्र, आता त्यांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
https://www.instagram.com/p/DA_S3DGCF81
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | जबरी चोरी करणार्या सराईत गुंडाला 2 वर्षासाठी केले तडीपार