Jagatika Lingayat Mahasabha Pune | लिंगायत तत्वज्ञान अध्ययन शिबीर 6 एप्रिलला पुण्यात

Jagatika Lingayat Mahasabha Pune

पुणे : Jagatika Lingayat Mahasabha Pune | जागतिक लिंगायत महासभा, पुणे शहरातर्फे ‘लिंगायत तत्वज्ञान अध्ययन शिबीर’ आयोजित करण्यात आले आहे. रविवारी 6 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजण्याच्या दरम्यान एरंडवणे येथील डॉ. कलमाडी श्यामराव कन्नड मीडियम स्कूल येथे हे शिबीर संपन्न होईल अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस बसवराज कनजे व चिटणीस चंद्रकांत हारकुडे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

बाराव्या शतकात महात्मा बसवण्णा यांनी समस्त मानव जातीच्या उध्दारासाठी दिलेले तत्वज्ञान जाणून घेण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून मिळणार आहे. शिबिरात मन:शांतीसाठी शिवयोग, अष्टावरण : सर्वांगीण उन्नतीचा मार्ग, सुखी समृध्द जीवनासाठी वचन संदेश आणि महात्मा बसवेश्वरांबाबत समज, गैरसमज आणि वास्तव या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिराच्या ठिकाणी पुस्तकांचा स्टॉल देखील असणार आहे.

https://forms.gle/smpQmebaSXpkiH2PA

शिबिरात सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करण्यात येत आहे. तसेच रविवारी शिबिराच्या ठिकाणी देखील नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 9890494339 या नंबरवर संपर्क करण्यात यावा असे आवाहन जागतिक लिंगायत महासभा, पुणे शहरतर्फे करण्यात आले आहे.

You may have missed