Jalna Crime | प्रियकराकडून बदनामीच्या धमक्यांना कंटाळून १८ वर्षीय तरुणीची आत्महत्या; जालन्यात खळबळ

susaide (2)

जालना ः पोलीसनामा ऑनलाईन – Jalna Crime | जालना जिल्ह्यातील भोकरदनच्या फत्तेपूर गावात १८ वर्षीय तरुणीने प्रियकराच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शिवानी गिरी असे या मृत तरुणीचे नाव आहे. तिचा मृतदेह प्रियकराच्या घरी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल आघामसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. फत्तेपुर गावात एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. तिने पियकराच्या बदनामीच्या धमकीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवानीला आरोपी विशाल आघाम याने तिची बदनामी करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे मानसिक तणावाखाली येऊन तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

You may have missed