Jalna Crime News | मोबाईल पाण्यात फेकला म्हणून 13 वर्षीय मुलाने केली 41 वर्षीय महिलेची हत्या; जालना जिल्ह्यात खळबळ

जालना : Jalna Crime News | मोबाईल पाण्यात फेकला आणि शेतात जाणारे पाणी अडवल्याच्या रागातून चक्क 13 वर्षीय मुलाने 41 वर्षीय महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली टेंभी येथे ही घटना घडली. मृत महिलेचे नाव मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे असे आहे. याप्रकरणी अंकुश सदाशिव औटे यांनी तीर्थपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. (Murder Case)
समोर आलेल्या माहितीनुसार, 25 मार्चला शेतात पाटाचे पाणी आणि मोबाईल पाण्यात फेकल्यावरून 13 वर्षीय मुलाचा महिलेशी वाद झाला. याच रागातून मुलाने 41 वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारले. यात संबंधित महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हत्येचा छडा लावला. पोलीस तपासानंतर संबंधित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे
या घटनेनंतर गावातील काही लोकांनी एका मुलाला शेतातून पळताना पाहिले होते. त्यांनी पोलिसांना या मुलाचे वर्णन दिले, ज्यामुळे पोलिसांना तपासात सहकार्य झाले. तीर्थपुरी पोलिसांनी एकूण 7 संशयितांची चौकशी केली. अखेरीस शेजारील शेतातून पळणाऱ्या या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने कबुली दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.