Jalna Crime News | लग्नाचा बस्ता बांधला, 10 दिवसांवर लग्न; लग्नाची जय्यत तयारी; 27 वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवलं जीवन

Jalna Crime

जालना : Jalna Crime News | लग्नाचा बस्ता बांधला, १० दिवसांवर लग्न असताना तरुणाने गळफास घेत जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. राम पांडुरंग घाईत (वय-२७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरूवारी (दि.३) रात्री ७ वाजताच्या सुमारास घडली. (Suicide Case)

अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील राम धाईत या शेतकरी कुटुंबातील तरुणाने बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेले होते. त्याचे नुकतेच लग्न जमले होते. जालना जिल्हयातील मंठा तालुक्यातील तळणी येथील एका मुलीशी विवाहाची मंगळवारी (दि.१५) गाठ बांधली जाणार होती. यामुळे लग्नाची जय्यत तयारी म्हणुन गुरूवारी (दि.३) जालना शहरात लग्नासाठीचा नवरदेव, नवरीचा बस्ता बांधला होता. अवघ्या ११ दिवसांवर लग्नाची बांधली जाणारी रेशमगाठ अखेर मध्येच तुटली गेली.

जालना शहरातुन बस्ता बांधल्यानंतर राम व त्यांचे नातेवाईक सायंकाळी आपल्या मुळ डोमेगाव येथे पोहहोचले. राम हा घरात कोणाला काहीही न बोलता शेतात निघून गेला. घरातून जाताना राम कोणाशी काहीच बोलला नाही, तसेच तो नाराज असल्याचे भावजयने आपल्या पतीला सांगितले. त्यानंतर भावाने अनेकदा रामच्या मोबाईलवर संपर्क केला. मात्र फोन उचलला गेला नाही. त्यानंतर कुटूंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. पाचोड येथे जावून पाहिले. मात्र तेथे शोध लागला नाही.

अखेर स्वतःच्या शेतात गेल्यानंतर गाव शिवारातील गट नंबर १७३ मधील शेतातील झाडाला रामने दोरीने गळफास घेऊन गुरूवारी रात्री सात वाजताच्या सुमारास आपली जीवनयात्रा संपविल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थ व नातेवाईकांच्या वतीने अंबड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल रामला दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून शोकाकूल वातावरणात राम घाईत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

You may have missed