Jambhulwadi Pune Crime News | जांभुळवाडीत भरदिवसा रंगला तीन पत्तीचा जुगार ! पुणे शहरात पोलिसांच्या कारवाईमुळे आडबाजूला जाऊन सुरु होता जुगार, 17 जणांना अटक

gambling

पुणे : Jambhulwadi Pune Crime News | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सातत्याने घातल्या जात असलेल्या धाडी, पकडण्याची भिती यातून शहरातील अनेक जण उपनगरात जाऊन जुगार खेळू लागले. जांभुळवाडीतील माऊली बिल्डिंगमध्ये भर दिवसा तीन पत्तीचा जुगार रंगला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) येथे छापा घालून १७ जणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १६ हजार ९७० रुपयांचा माल जप्त केला आहे. (Pune Police Raid On Gambling Den)

किरण गणपत डिंबळे (वय ३५, रा. पर्वती), रोहिदास बाळु गोरड (वय ४३, रा. पर्वती), हर्षद थोरवे (वय २४, रा. शुक्रवार पेठ), दत्ता रघुनाथ जोगी (वय ३२, रा. कात्रज), भिकाजी कापुरे (वय ६३, रा. धनकवडी), विराज पाटील (वय ४५, रा. कात्रज), मुनावर वजीर शेख (वय ४०, रा. कात्रज), वसंत करसन वाघ (वय ४६, रा. शिवणे), योगेश घुमक (वय ३५, रा. सिंहगड रोड),धमेंद्र रघुनी सिंग (वय ३९, रा. हडपसर), दत्ता वसंत सितप (वय ५२, रा. नर्‍हे), राजेश उत्तेकर (वय ५३, रा. धनकवडी), इम्रान दलाल (वय ३६, रा. कात्रज), लक्ष्मण मानकर (वय ५३, रा. धनकवडी), किशोर सातपुते (वय ३८, रा. दांडेकर पुल), साहिल इब्राहिम साठी (वय २३, रा. धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार जांभुळवाडी येथील माऊली बिल्डिंगमध्ये रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मानकर याने आरोपींना तीन तीन पत्ती जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. किशोर सातपुते याने स्वत:च्या फायद्यासाठी हा जुगार अड्डा चालवित होता़ इब्राहिम साठी याने जुगाराचे साहित्य पुरविण्याचे काम केले व जुगार खेळणार्‍यावर देखरेख करण्याचे काम करत होता.

येथे जुगार खेळला जात असल्याचे माहिती मिळाल्यावर भारती विद्यापीठ पोलिसांनी छापा टाकला. त्या ठिकाणी एकूण १५ पत्त्याचे कॅट, १७ मोबाईल, रोख १९ हजार ९७० रुपये असा १ लाख १६ हजार६२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर (PSI Mohan Kalamkar) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed