Jammu Kashmir Encounter | जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, तीन जवान शहीद

Jammu Kashmir Encounter2

जम्मू-काश्मीर : Jammu Kashmir Encounter | जम्मू आणि काश्मीर मधील (Jammu And Kashmir) कठुआ जिल्ह्यातील घनदाट जंगलात गुरुवारी (27 मार्च) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र या चकमकीत जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे 3 जवान शहीद झाले आहेत. तर इतर दोन जवान जखमी झाले आहेत. ही चकमक 4 दिवसांपासून कठुआच्या जंगलात सुरू असल्याची माहिती आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, जुठाना येथील एका घनदाट जंगलात चार ते पाच दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलांनी जुठाणा भागात त्यांचे नेमके ठिकाण शोधले, त्यानंतर गोळीबार सुरू झाला. ही चकमक हिरानगर सेक्टरपासून सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या जाखोले गावाजवळ झाली. रविवारी (23 मार्च) त्याच भागात पहिली चकमक झाली, ज्यात दहशतवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु, ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक (डीजीपी) नलिन प्रभात (Director General of Police (DGP) Nalin Prabhat) यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. चकमकीत मारले गेलेले दहशतवादी तेच आहेत, जे रविवारी हिरानगर चकमकीत पळून जाण्यात यशस्वी ठरले होते, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे.

You may have missed