Jath Sangli Accident News | दुर्दैवी ! नातेवाईकांना भेटून येताना दुचाकीस भरधाव वाहनाची धडक, भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू

जत: Jath Sangli Accident News | नातेवाईकांना भेटून येताना दुचाकीस अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत वडील आणि १५ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. रामू कुरणे (वय- ५५) व मुलगी जान्हवी रामू कुरणे (वय- १५) या दोघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.२२) रात्री साडेसात वाजताच्या सुमारास कर्नाटकातील अनंतपूर ते डफळापूर मार्गावरील सीमेवर घडला. बापलेकीच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे. (Father And Daughter Died In Accident)
अधिक माहितीनुसार, रामू कुरणे हे मुलगी जान्हवीसह नातेवाईकांकडे शनिवारी (दि.२२) दुचाकीवरून गेले होते. नातेवाईकांना भेटल्यानंतर सायंकाळी अनंतपूर ते डफळापूर मार्गे जतकडे येत होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कर्नाटकातील अनंतपूर हद्दीत अज्ञात वाहनाने कुरणे यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर वाहन चालकाने तेथून पळ काढला. धडकेत रामू कुरणे व मुलगी जान्हवी हे दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यु झाला.
त्यानंतर या दोघांना अथणीच्या शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह मेंढीगिरी गावी आणण्यात आला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आले. या अपघाताची नोंद अथणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. रामू कुरणे हे फोटोग्राफर म्हणून कार्यरत होते. (Jath Sangli Accident News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण