Jayant Patil On Ajit Pawar | ‘अजितदादा सध्या इव्हेंट मॅनेजरचे जास्त ऐकतात’; जयंत पाटलांचे अजित पवारांना शाब्दिक चिमटे; म्हणाले – ‘जर ते भाजपबरोबर…’
धाराशिव : Jayant Patil On Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उभं करणं चूक होती अशी जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. अजित पवारांच्या या कबुलीनंतर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा (Shivswaraj Yatra) धाराशिवमध्ये असताना जयंत पाटलांनी अजित पवारांवर निशाणा साधला. शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवारांना त्यांच्या वक्तव्यावरून शाब्दिक चिमटे काढले आहेत.
जयंत पाटील म्हणाले, जर ते भाजपबरोबर (BJP) गेलो, ही माझी चुक होती असं बोलले तर ते खरं वाटलं असते. पण ते तसं काही बोलले नाहीत. त्यावरून त्यांची भूमिका बदलली आहे असे वाटत नाही. अजितदादा सध्या इव्हेंट मॅनेजरचे जास्त ऐकतात. ते सांगतील तेवढेच बोलतात. आता त्यांना असं बोला म्हणजे फायदा होईल असं सांगितलं असेल. त्यामुळेच त्यांनी हे वक्तव्य केलं असावं असं म्हणत त्यांनी अजित पवारांची खिल्ली उडवली आहे.
ते पुढे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुर्ण ताकदीने कामाला लागा. राज्यात सत्ता आणणे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री कोण होईल ही बाब महत्वाची नाही. सत्ता येणे हे महत्वाचे आहे. महायुतीच्या सरकारला पाय उतार करायचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री काँग्रेसचा होईल की राष्ट्रवादीचा होईल. याचा विचार कोणी करून नका. आपल्याला सत्ता आणयची आहे हे लक्षात ठेवा असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा