Jayant Patil On Ajit Pawar | ‘अजित पवारांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी…’,जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

मुंबई: Jayant Patil On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीवरून (Maharashtra Assembly Election 2024) राजकीय हालचालींना वेग आलेला असताना सत्ताधारी आणि विरोधक एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घरात फूट पडल्याची चूक कळली असली तरी त्यांना महायुतीतून (Mahayuti) लढल्याशिवाय पर्याय नाही असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. सांगलीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जयंत पाटील म्हणाले, अजित पवार आता कोणतीही वेगळी भूमिका घेऊ शकत नाहीत. जी टांगती तलवार त्यांच्या डोईवर लटकत असल्यामुळे त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला ती तलवार अजून हटलेली नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते कोणताही वेगळा निर्णय घेऊ शकत नाहीत.
विधानसभेच्या तोंडावर पुन्हा सीबीआय (CBI), ईडीच्या (ED) धाकाने नव्या राजकीय खेळ्या करण्याची चूक आता भाजपवाले (BJP) करणार नाहीत. अशा यंत्रणांचा कशासाठी वापर होतोय, हे लोकांना कळाले आहे. त्यामुळे अगोदरच लोकांच्या मनातून उतरल्यानंतर आता अशा कारवाईच्या माध्यमातून ते आणखी खाली उतरतील, असे मला वाटत नाही.
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही केवळ निवडणुकीसाठीच काढली आहे. ‘अति तिथे माती’ या म्हणीप्रमाणे सरकारची अवस्था होईल. पैसे वाटपाच्या योजनेतून राज्याला आणखी आर्थिक संकटात टाकले जात आहे. विकासकामांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावली आहे. भविष्यात एक रुपयासुद्धा विकासकामांना मिळणार नाही. राज्यातील महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा किंवा धोरण ठरलेले नाही. योग्यवेळी धोरण ठरेल, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली