Jayant Patil On Ajit Pawar | ‘आम्ही सांगून ते बदलले नाहीत मात्र एजन्सीचे ऐकून बदलले’, अजित पवारांवर जयंत पाटलांची खोचक टीका
मुंबई : Jayant Patil On Ajit Pawar | लोकसभा निवडणूक आणि त्यानंतरच्या निकालानंतर राज्यात अनेक राजकीय समीकरणं बदलली. महाराष्ट्रात बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आला आणि आता राज्यात चर्चा सुरू आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024). एकिकडे सत्ताधारी महायुती (Mahayuti) बहुमताच्या आकड्यावर लक्ष केंद्रीत करत असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) सत्ताधाऱ्यांना तोडीस तोड आव्हान देण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहे. पक्षांतर्गत मोर्चेबांधणीलाही आता वेग आला आहे. ‘
दरम्यान आगामी निवडणुकीवरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंक पॉलिटिक्सवर माध्यमांशी बोलताना निशाणा साधला आहे.
जयंत पाटील म्हणाले , ” मी आणि अजित पवार अनेक वर्षे एकत्र होतो, याआधी त्यांना आम्ही अचूक सूचना करायचो. आम्ही सांगूनही कधी अजित पवार बदलले नाहीत. त्यांनी आपला स्वभाव बदलला नाही. पण एका कंपनीला आता त्यांनी प्रचंड पैसे दिले आहेत, त्यांच्या जनसंपर्काची काम ती कंपनी करत आहे. त्या कंपनीने सांगितल्याप्रमाणे अजित पवार बदलले आहेत. ते सांगतात तसे ते कपडे घालत आहेत “, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला.
महायुती सरकारने आत्मविश्वास गमावला आहे. ३०० कोटी रुपये जाहिरातीसाठी,
तसेच ३०० कोटी रुपये योजना दूतांना दिले आहेत. त्यांना सहा महिन्यांचे कंत्राट दिले आहे.
त्यांना प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये दिले जाणार आहेत, असंही पाटील म्हणाले. (Jayant Patil On Ajit Pawar)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार
PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी