Jayant Patil On Ajit Pawar NCP | ‘शिंदे गट अजितदादांना सत्तेतून बाहेर काढणार’, जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले – “अजित पवारांना पश्चाताप झाला असेल…”

Jayant Patil-Ajit Pawar

मुंबई : Jayant Patil On Ajit Pawar NCP | विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) जसजशी जवळ येत आहे तसे महायुतीतील (Mahayuti) मित्रपक्ष अजित पवारांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. “अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही. अनेक वेळा नकाराचा शेरा मिळून फाईल परत येत असे. पण पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले.

दोन अडीच महिन्यात येणारे विघ्न दूर करण्यासाठी प्रयत्न करा. स्वार्थाबरोबर परमार्थही साधावा लागतो,” असे विधान मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले होते. त्याअगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (Rashtriya Swayamsevak Sangh – RSS) महायुतीतल्या अजित पवारांच्या सहभागावर प्रश्न उपस्थित करत भाजपची (BJP) कानउघाडणी केली होती.

“मी हाडामासांचा शिवसैनिक (Shivsainik) आहे. आयुष्यात कधीही काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीशी (NCP) माझे जमलेले नाही. शिक्षण घेत असल्यापासून मला त्यांचे पटलेले नाही. आज जरी मंत्रिमंडळात आम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असलो तरी बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. हे सहन होत नाही”, अशी टीका मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी अजित पवारांना उद्देशून केली होती.

या विधानानंतरच अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का, अशा आधी दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेला अधिक कंठ फुटला. बहुमत असताना अजित पवारांना महायुतीत सहभागी करून घेण्याची गोष्ट शिवसेना शिंदे गटाला आवडलेली दिसत नाही. त्यातूनच अजित पवारांना लक्ष्य केले जात असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

“अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्दैवी आहे. खरे म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगाशी संग म्हणतात असा संग घडला आहे”, असे विधान भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) यांनी केले होते.

गडचिरोलीचे नेते राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम (Dharamrao Baba Atram) यांची लेक भाग्यश्री आत्राम-हलगेकर (Bhagyashree Atram) लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यावरून अजित पवार म्हणाले होते की, ‘वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक होती, मी हे मान्य केली आहे “, असे अजित पवारांनी सांगितले.

या सर्व घडामोडी वरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
यांनी शिंदे गट अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढणार असे वक्तव्य केले आहे.
एकनाथ शिंदे यांचा गट हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महायुतीतून बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे,
असा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाहेर
काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला.

गुलाबराव पाटील यांनी अशी टीका करणे योग्य नाही.
पण अशी टीका करुन महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढून शिवसेनेला जास्त जागा
महायुतीत मिळाव्यात असा काही त्यांचा प्लान असेल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

काल गडचिरोलीमध्ये अजित पवार यांनी असं वक्तव्य करुन बाबा अत्राम आणि
त्यांच्या मुलीला घरात फूट पडू नका असा संदेश दिला असेल
पण त्यांना त्यांच्या बद्दल काही पश्चाताप झाला असेल याबद्दल मला माहित नाही, असेही जयंत पाटील म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते येरवडा, गांधीनगर भागात 2 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ

Pune Police News | आता पुण्यात योगी पॅटर्न ! गुन्हेगारांच्या बेकायदेशीर घरांवर फिरणार बुलडोझर
– पोलीस आयुक्त अमितेश कुमार

PMC News | पुणे शहरातील प्रमुख रस्ते सहा महिन्यांपासून अस्वच्छतेच्याच गर्तेत !
मॅकेनिकल स्विपिंगच्या निविदांना विलंब झाल्याने ‘स्वच्छ पुण्याची’ ऐशीतैशी

You may have missed