Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण; म्हणाले – ‘…तर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते’
माढा : Jayant Patil On Ajit Pawar | राज्याची सामाजिक आणि राजकीय घडी विस्कटल्याचे चित्र आहे. मागील काही काळात राज्यात सामाजिक आणि राजकीय बरेच बदल झाले आहेत. ठाण्यातील एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची आपली इच्छा बोलून दाखवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा कर्मयोगी’ या पुस्तकाचे प्रकाशन काही दिवसांपूर्वी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत फटकेबाजी करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून म्हटलं होतं की, “जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलं की इतके इतके आमदार आणल्यानंतर मुख्यमंत्री करतो, तेव्हा मलाच सांगितलं असतं तर मी अख्खा पक्षच घेऊन आलो असतो. जाऊद्या आता काय, शेवटी हा नशिबाचा भाग असतो.
देवेंद्र फडणवीस यांची आमदार म्हणून टर्म १९९९ ला सुरू झाली, तर एकनाथ शिंदे यांची २००० ला सुरुवात झाली. यांच्यात सर्वांत सिनियर मी आहे, माझी सुरुवात १९९० मध्ये झाली. तरी मी मागे राहिलो, मला जर संधी दिली असती तर मी पूर्ण पार्टी आणली असती, त्यांनी तर फक्त आमदारच आणले,असे वक्तव्य अजित पवारांनी केले होते.
राज्याने पाच वर्षांमध्ये तीन वेगवेगळे मुख्यमंत्री पाहिले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी एकाच पंचवार्षिकमध्ये तीनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला. मात्र अनेकदा उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळलेल्या अजित पवारांना अद्याप एकदाही राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होता आलं नाही. हीच सल त्यांनी बोलून दाखवली. आता त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याची राजकीय वर्तुळाच चांगलीच चर्चा होत आहे.
अजित पवार महाविकास आघाडीसोबत असते तर ते मुख्यमंत्री झाले असते का?
असा प्रश्न माढा दौऱ्यावर असताना जयंत पाटलांना विचारण्यात आला.
त्यावर पाटील म्हणाले, “हो ते मुख्यमंत्री झाले असते. महाराष्ट्रात सध्या चांगलं वातावरण आहे.
राज्यात महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, असं चित्र आहे.
त्यामुळे अजित पवार महाविकास आघाडीसोबत असते तर त्यांना सोईची परिस्थिती निर्माण झाली असती,”
असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु