Jayant Patil On BJP | ‘पक्षात येणाऱ्यांना स्वच्छ करून घेण्यासाठी आमच्याकडे लॉन्ड्री नाही’, इन्कमिंगवरून जयंत पाटलांचा खोचक टोला
पुणे : Jayant Patil On BJP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) दृष्टिकोनातून राष्ट्रवादी शरद पवार गटात (Sharad Pawar NCP) सर्वाधिक इन्कमिंग सुरु असल्याचे दिसत आहे. २०१९ च्या निवडणुकीदरम्यान अशाच प्रकारची मेगा इन्कमिंग भाजपमध्ये (Mega Incoming In BJP) झाली होती. भ्रष्टाचाराचे आरोप (Allegations Of Corruption) असलेल्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यावरून विरोधकांनी भाजपकडे भ्रष्टाचारी नेत्यांना स्वच्छ करण्याची मशीन आहे, अशी टीका केली होती. आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये इन्कमिंग होत असताना पक्षाचे धोरण काय असणार यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा केला आहे.
दरम्यान पुण्यात जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार आणि भाजप नेते मदन भोसले (Madan Bhosale) हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मी मदन भोसले यांना सहजच भेटायला गेलो होतो. या भेटीदरम्यान पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. माझे आणि त्यांचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडे चहासाठी गेलो असल्याचा खुलासा करत मदन भोसले यांच्या पक्षप्रवेशावर जास्त बोलणं जयंत पाटील यांनी टाळलं.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक इनकमिंग हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे असल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे. आमच्याकडे आल्यानंतर त्यांना भयमुक्त वातावरणात काम करता येईल असं वाटत असल्याने आमच्याकडे लोकांचा ओढा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांमध्ये येऊ इच्छित असणाऱ्यांना आम्ही आहे,
तसे घेणार आहोत कारण आमच्याकडे स्वच्छ करणारी लॉन्ड्री नाही. आतापर्यंत आम्ही कोणावरही आरोप केलेले नाही.
त्यामुळे त्यांना स्वच्छ करून घेण्याची आम्हाला आवश्यकता पडणार नाही.
ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना स्वच्छ केला असेल त्यामुळे ते स्वच्छ झालेत असं समजून त्यांना आम्ही आमच्याकडे घेऊ असं जयंत पाटील म्हणाले.
हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या पक्ष प्रवेशावरील चर्चेवर बोलताना अद्याप आम्ही इंदापूरपर्यंत पोहोचलो नसल्याचे सांगत त्यांनी प्रश्नाला बगल दिली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय
