Jayant Patil On Devendra Fadnavis | ‘पवारांच्या मनातील मला कळते, पण शहांना फडणवीसांच्या मनातील कळत नाही’, जयंत पाटलांचा खोचक टोला

Jayant Patil-Devendra Fadnavis

पुणे : Jayant Patil On Devendra Fadnavis | श्रमिक पत्रकार संघाच्या (Pune Shramik Patrakar Sangh) वतीने महाराष्ट्र व्हिजन-२०५० चे (Maharashtra Vision 2050) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

“शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे जवळजवळ शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे असतील त्यात उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) चेहरा नक्कीच नाही. मी शरद पवारांच्या डोक्यात कोण नाही, हे सांगू शकतो. पण शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदासाठी कोण आहे, हे सांगणं फार कठीण आहे “, असे भाष्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केले होते.

त्यानंतर आता जयंत पाटील यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. जास्त काळ शरद पवारांसोबत राहिल्याने त्यांच्या मनातील मला कळते, असा दावा करतानाच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी अमित शहा (Amit Shah) यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललंय हे कळत नसल्याचे वक्तव्य करत टोला लगावला आहे.

ते म्हणाले, ” शरद पवारांची भूमिका कायम त्यागाची राहिली आहे. आमच्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुतारी हातात घेण्यासाठी लोकांच्या भावना आहेत. मुख्यमंत्री कोण होईल यापेक्षा आता असलेले सरकार घालविणे जास्त महत्वाचे आहे. भारतीय जनता पार्टी सुतकात आहे. मूळ भाजपवाले बाजुला राहिले आणि बाकीचे लोक पक्ष चालवत आहेत, अशी टीका पाटलांनी केली.

आरक्षणावर सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, आमचा पाठिंबा असेल.
भाजपची (BJP) लोकप्रियता कमी झालेली आहे. त्यामुळे ते अजित पवारांना वेगळे लढावे,
मग एकत्र येऊ असे सांगतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed