Jayant Patil On Eknath Shinde | ‘बदलापूरच्या घटनेत गृह खात्याची गुन्हा नोंदण्यास दिरंगाई’, जयंत पाटलांचा सवाल, म्हणाले – “मुख्यमंत्र्यांना यात राजकारण कसं दिसतं?”
मुंबई : Jayant Patil On Eknath Shinde | बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या (Badlapur School Girl Incident) घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी बदलापूरमध्ये जमा झाली होती. आंदोलकांनी संबंधित शाळेत प्रवेश करत तोडफोड केली. त्याचवेळेस काही आंदोलक रेल्वे स्थानकाकडे गेले व त्यांनी रुळांवर ठिय्या मांडला.
दरम्यान बदलापूर रेल्वे सेवा ९ ते १० तास संपूर्ण ठप्प झाली होती. यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक धक्कादायक आरोप केला. ‘या आंदोलकांमुळे लाखो रेल्वे प्रवाशांना त्रास झाला आहे. नऊ तास रेल्वे बंद होती. हे व्हायला नको होतं. यावरूनच कालचं आंदोलन हे राजकीय प्रेरित होतं’, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
‘या आंदोलनात स्थानिक लोक कमी होते. मात्र बाहेरून गाड्या भरून लोकं आली होती.त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. तरीही ते जायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारला बदनाम करायचं होतं. तसेच एवढ्या वेळ रेल्वे रोखणं हे देशाचं नुकसान आहे. या घटनेचं राजकारणं चुकीचं आहे. हे राजकारण करणाऱ्याला लाज वाटली पाहीजे.
आंदोलनकर्त्यांनी लाडकी बहीण योजनेचे बॅनर आणले होते. असं बॅनर कोण आणतं? असे बॅनर लगेच तयार करून आंदोलनात आणले. त्यामुळे आता मला विरोधकांना एकच सांगणं आहे, लाडकी बहीण योजनेवरून तुम्हाला जी पोटदुखी झाली आहे ती या घटनेतून दिसून आली आहे’, असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जयंत पाटील म्हणाले , ” महाराष्ट्रात महिला, बालकांविरोधात होत असलेल्या अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. राज्यातील गृह खात्याचे हे सपशेल अपयश आहे. या निष्क्रिय सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने येत्या २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, संघटना या बंदमध्ये सहभागी होतील.
बदलापूरमध्ये झालेली घटना राजकीय नसून त्याचा कोणीही फायदा घेत नाहीये. महाराष्ट्रामध्ये वाढलेले अत्याचार याची परिसीमा आता गाठलेली आहे. बदलापूरच्या घटनेत गृह खात्याने गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई केली. शाळा संस्थेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच बदलापूरकर चिडले आणि रस्त्यावर आले. यात भाजप आणि मुख्यमंत्र्यांना राजकारण कसं दिसतं हे आम्हाला कळत नाही,” असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
“महाराष्ट्रातील बालकांविरोधी गुन्हे २०१४ साली आठ हजार होते ते आता २२ हजारांपर्यंत गेले आहेत.
महिलांवरील अत्याचार २६ हजारांवरून ५० हजारांपर्यंत पोहोचले आहेत. हे गंभीर आहे.
त्याविरोधात २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यात राजकारण नाही.
महाराष्ट्रात कसा अन्याय चालू आहे हे सरकारला दाखवून देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, अत्याचाराच्या घटनेविरोधातील आंदोलन हे पूर्वनियोजित असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
लैंगिक अत्याचार प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर सोमवारीच हे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न होता.
मात्र सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे आंदोलन मंगळावारी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही व्हॉट्सअँप ग्रुप तयार करून त्यावरून लोकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच आंदोलक बदलापूर स्थानकाच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली होती.
सकाळी १० वाजता रेल्वे सेवा पहिल्यांदा रोखली गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Female Education Officer | 2 लाखांची लाच घेताना महिला शिक्षणाधिकारी एसीबीच्या जाळ्यात;
शासनाने दिलेले थकीत वेतन अधीक्षकांनी ठेवले अडवून
Eknath Shinde On Badlapur School Girl Incident | बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट;
म्हणाले, बाहेरून लोकं आणली, आंदोलन राजकीय प्रेरित…”
Maharashtra Assembly Election 2024 | भाजपचे दोन नेते शरद पवारांच्या संपर्कात, राजकीय समीकरणे बदलणार?