Jayant Patil On Mahayuti Govt | हिंदू देवस्थानांच्या जमिनी सत्ताधार्‍यांनी लुटल्या, जयंत पाटलांचा गंभीर आरोप, हिंदुत्ववादी संघटनांनंतर विरोधकही आक्रमक

Jayant Patil

मुंबई : Jayant Patil On Mahayuti Govt | राज्यातल्या हिंदू देवस्थानांच्या जमिनी सरकारी पक्षातील नेत्यांनी लुटल्याचा गंभीर आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. ते मुंबईत आयोजित महाविकास आघाडीच्या मेळाव्यात (Mahavikas Aghadi Melava) बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही मंदिरांच्या जमिनींबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका केली.

यावेळी जयंत पाटील यांनी केलेला आरोपाची सध्या चर्चा सुरूआहे. दरम्यान, मंदिरांच्या जमिनीबाबतच्या सरकारच्या निर्णयावर हिंदू जनजागृती समितीच्या मदिर न्यासाने जाहीर नाराजी व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाविकास आघाडीच्या मेळाव्या याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात हिंदू देवस्थानांना शिवाजी महाराजांच्या काळापासून जमिनी देण्यात आल्या होत्या. भाजपाच्या एकदोन आमदारांनी या जमिनी लुटल्या. स्वत:च्या नावावर केल्या. ते करताना नजराणा भरायचा असतो. वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करताना भरायचा 50 टक्के नजराणा भरला नाही.

जयंत पाटील म्हणाले, विधानसभेत हा विषय मांडला तेव्हा महसूलमंत्री म्हणाले 2 महिन्यांत चौकशी करू. पण दोन वर्षांपासून चौकशी पूर्ण झालेली नाही. आता 13 तारखेला कॅबिनेटनं निर्णय घेतलाय की ही नजराण्याची किंमत कमी करून फक्त 5 टक्के असेल. या जमिनींवर आधीच या बहाद्दरांनी इमारती उभ्या केल्या आहेत.

जयंत पाटील पुढे म्हणाले, म्हणजे महाराष्ट्रात हिंदू देवस्थानांच्या जमिनी लुटण्याचे पाप भाजपाच्या डोक्यावर जाते. त्यावर झाकाझाकी करण्यासाठी हा 5 टक्क्यांचा निर्णय घेतला आहे. यावर आधीच न्यायालयात सुनावणी चालू आहे. जमिनी लाटणारेच हा निर्णय व्हावा म्हणून कॅबिनेटच्या बैठकीत बसून होते, असा खळबळजनक आरोप देखील जयंत पाटील यांनी यावेळी केला.

सरकारच्या निर्णयाचा परिणाम काय होणार…

  • या निर्णयामुळे आता देवस्थानच्या जमिनी सध्या ज्यांच्या ताब्यात आहेत, त्यांना त्याच्यावर मालकी हक्क मिळणार आहे.
  • या निर्णयाचा परिणाम मराठवाडा विभागाच्या आठही जिल्ह्यात होणार आहे.
  • मराठवाड्यातील 42 हजार 710.31 हेक्टर जमीन ही अतियात अनुदान किंवा खिदमतमाश इनाम जमिनी (देवस्थानाच्या देखभालीसाठी दिलेल्या जमिनी) आहेत.
    तसेच 13 हजार 803.13 हेक्टर जमीन ही मदतमाश इनाम जमीनी आहेत. या जमिनी देवस्थानच्या कारभारासाठी देण्यात आल्या होत्या.
  • यापूर्वी या जमिनी वर्ग 2 मध्ये मोडत असल्याने जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगी शिवाय
    या जमिनीच्या वापराचा किंवा हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेता येत नव्हता.
  • आता देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जमिनींचा निर्णय घेण्याचा अधिकार सध्या जमिनीचा ताबा असलेल्यांना घेता येणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ,
रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

Khadki Pune Crime News | सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने केला 9 वर्षाच्या मुलीचा विनयभंग

Hadapsar Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलांनी नामांकित शाळेतील मुलींचे नग्न फोटो तयार करुन केले व्हायरल

Ajit Pawar On Builders In Pune | बांधकाम व्यावसायिकांनी नदी, नाले, ओढयात अतिक्रमण आणि बांधकाम करू नये –
पालकमंत्री अजित पवार यांचे आवाहन

You may have missed