Jayant Patil On Mahayuti Govt | ‘पोलीस सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत, अन्यथा बदलापूरच्या शाळेवर कारवाई झाली असती’, जयंत पाटलांचा निशाणा
पुणे : Jayant Patil On Mahayuti Govt | राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि.२५) पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना बदलापूरच्या घटनेवरून (Badlapur Case) महायुती सरकारवर निशाणा साधला. पोलीस फक्त राज्य सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात. असं नसतं तर आतापर्यंत शाळा प्रशासनावर कारवाई झाली असती. सरकार लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) व्यस्त आहे. मात्र, याच बहिणींच्या मुली असुरक्षित आहे, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.
जयंत पाटील म्हणाले, बदलापूरची घटना ही सामान्य माणसाला चीड आणणारी आहे. यावर कोणी राजकारण करायची गरज नाही. लहान बालकं सुरक्षित नाहीत, हे सरकार नाकर्ते आहे. महिला सुरक्षित नाहीत. एका योजनेमुळे सरकारला असं वाटतेय हीच योजना आपली तारणहार आहे. पण अर्थ खात्याला झोप लागत नसेल. पण आमचा कोणत्याही योजनेला विरोध नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर जयंत पाटील प्रत्युत्तर देत म्हणाले, राज ठाकरे जे आरोप करतात, त्या आरोपात कोणताही तथ्य नाही. ते सारखं हॅमर करत राहतात,असा दावा पाटील यांनी केला.
माजी आमदार आणि भाजप नेते मदन भोसले हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मी मदन भोसले यांना सहजच भेटायला गेलो होतो.
या भेटीदरम्यान पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. माझे आणि त्यांचे अनेक वर्षांपासून संबंध आहेत.
त्यामुळे मी त्यांच्याकडे चहासाठी गेलो असल्याचा खुलासा करत मदन भोसले यांच्या पक्षप्रवेशावर जास्त बोलणं जयंत पाटील यांनी टाळलं.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय