JCB Accident In Latur | बेधुंद अवस्थेत जेसीबी चालकाचा थरार; १० ते १२ जणांना उडवले, एकाचा जागीच मृत्यू ; व्हिडिओ व्हायरल

JCB Accident In Latur

लातूर : JCB Accident In Latur | शहरातील कन्हरी चौकात रात्री उशिरा बेधुंद अवस्थेत मद्य प्राशन करून जेसीबी चालकाने रस्त्यावरील दहा ते बारा जणांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. जालिंदर मुळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जालिंदर हा भाजीपाला आणण्यासाठी बाजारात गेला होता, त्यादरम्यान या जेसीबी चालकाने त्याच्यावर जेसीबी चढवला, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी जेसीबी चा पाठलाग करत जेसीबी चालकाला धरून पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पोलिसांनी जेसीबी चालकावर गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे. तर या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (JCB Accident In Latur)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai-Pune News Railway Line | आता लोणावळ्याशिवाय मुंबई-पुणे असा प्रवास करता येणार; रेल्वेकडून प्रस्ताव तयार

Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाल्या – “संसदेत बोललं की नवऱ्याला आयकरची नोटीस येते”

Yerawada Pune Crime News | अपघाताची नुकसान भरपाई देण्याच्या वादातून तरुणावर टोळक्याने केले कोयत्याने वार

Bibvewadi Pune Crime News | सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !
पोस्कोखाली गुन्हा दाखल झाल्याने होता टेन्शनमध्ये

You may have missed