Jio Diwali Damaka | जिओचा दिवाळी-धमाका ! 699 रुपयांमध्ये मिळेल ‘जिओभारत’ 4G फोन

Jio Diwali Damaka | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने या दिवाळीत जिओभारत 4जी फोनच्या किमतीत 30 टक्के कपात केली आहे. मर्यादित कालावधीच्या या ऑफरमध्ये, 999 रुपयांचा जिओभारत मोबाइल फोन आता 699 रुपयांच्या विशेष किमतीत उपलब्ध आहे. जिओभारत फोनला 123 रुपयांमध्ये रिचार्ज करता येईल. या मासिक टॅरिफ प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री व्हॉइस कॉल्स, 14 जीबी डेटा देखील मिळेल.
123 रुपये असलेला जिओचा मासिक रिचार्ज प्लॅन इतर ऑपरेटर्सच्या तुलनेत 40 टक्के स्वस्त आहे. कारण इतर नेटवर्क्स, फीचर फोनच्या मासिक रिचार्जसाठी किमान 199 रुपये आकारतात. हे जिओच्या तुलनेत 76 रुपये अधिक महाग आहे. याचा अर्थ असा की जर ग्राहक प्रत्येक रिचार्जवर 76 रुपये प्रति महिना बचत करतो तर पूर्ण फोनची किंमत 9 महिन्यांतच भरून निघेल. एका प्रकारे 9 महिन्यांच्या रिचार्जनंतर जिओभारत फोन ग्राहकांना मोफत मिळेल.
हा फक्त एक फोन नाही, 2जी वरून 4जी वर शिफ्ट होण्याची एक संधी आहे.
455 पेक्षा अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स, मूव्ही प्रीमियर आणि नवीन चित्रपट,
व्हिडिओ शो, लाईव्ह स्पोर्ट्स प्रोग्राम, जिओसिनेमाचे हायलाइट्स, डिजिटल पेमेंट, QR कोड स्कॅन
यासारख्या सुविधा जिओभारत ४जी फोनमध्ये उपलब्ध आहेत. जिओपे आणि जिओचॅट यासारखे प्रीलोडेड अॅप्स देखील या फोनमध्ये मिळतील. फोन जवळच्या स्टोअर्सशिवाय, जिओमार्ट किंवा ऍमेझॉनवर देखील खरेदी करता येईल.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; वंचितच्या उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी
Katraj Pune Crime News | कात्रजमध्ये गुंडांचा हैदोस ! तरुणांना मारहाण करुन रिक्षा, कारच्या काचा फोडून माजवली दहशत
Maharashtra Assembly Election 2024 | केवळ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातून शासनाने कमविले किमान 43 लाख 62 हजार रुपये जादा