Jitendra Awhad On Ajit Pawar | ‘अजित पवार प्रचंड जातीयवादी माणूस’, जितेंद्र आव्हाडांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या निधीत…’

Jitendra Awhad Ajit Pawar

मुंबई : Jitendra Awhad On Ajit Pawar | शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी पक्षात (NCP) बंड झाल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) हे पक्ष विभागले गेले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

“अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस असून त्यांनी कधीही ओबीसी, एससी आणि एसटी यांना निधी दिला नाही. जिथे फायदा तिथे पैसे फिरवायचे. त्यातून टक्केवारी मिळायची”, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “अजित पवारांनी २०० कोटींचा हिशोब द्यावा, हा माणूस किती खडूस आहे. मला का नाही दिले? मी त्यांच्याच पक्षातील आमदार होतो मग मला का निधी दिला नाही. आयुष्यभर माझं वाईट चिंतणारे कोण होते तर ते अजित पवार होते.

अतिशय खुनशी आणि जातीयवादी माणूस आहे. अर्थसंकल्पात कायम अजित पवारांनी ओबीसी, एससी आणि एसटी यांच्या निधीत कपात केली आहे. कोणालाही विचारा. अजित पवार अर्थमंत्री असतानाही इतिहास काढा. प्रचंड जातीवादी माणूस आहे”

ते पुढे म्हणाले, ” मी अनुभवावरून सांगतोय, अजित पवार मंत्रिमंडळात असताना के. सी पाडवी
यांना ज्या पद्धतीने वागवायचे, हे पाहून माझ्या डोळ्यात अश्रू यायचे. के. सी पाडवी महाराष्ट्रातला एकटा भ्रष्टाचारी आणि
हा आरोप यांनीच लावायचा. अजित पवार धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्यासारखे वागायचे.

अर्थसंकल्पात प्रत्येक समाजासाठी तरतूद असते मात्र जेव्हा काटकसरीची वेळ येते तेव्हा ओबीसी, एससी, एसटी समाजाच्या निधी कापला जायचा.
जिथे यांचा फायदा तिथे पैसे फिरवले जायचे. समाज यांच्यासाठी महत्त्वाचा नाही. यांना समाजापेक्षा विकास महत्त्वाचा वाटतो कारण त्यातून जास्त टक्केवारी मिळते”,
असा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. (Jitendra Awhad On Ajit Pawar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed