Junnar Pune Crime News | 4 वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशाने मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप

Snake Bite - Child Death

ओतूर: Junnar Pune Crime News | पिंपळगाव जोगा, ता. जुन्नर येथील भोईरवाडी मधील एका चार वर्षाच्या चिमुरडीचा सर्पदंशाने (Snake Bite) मृत्यू झाला असून सदर चिमुरडीवर ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांनी वेळेत उपचार केले नसल्यामुळे तीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. (Junnar Pune Crime News)

आफ्रोज अमिर शेख ( वय ४,रा. भोईरवाडी, पिंपळगाव जोगे, ता. जुन्नर ) असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रोज शेख ही चिमुरडी सोमवारी (ता.२९) भोईरवाडी येथे आजोबांच्या घरात आईसोबत झोपली होती. रात्री बारा वाजताच्या सुमारास झोपेत असताना तिला विषारी सर्प चावला.

सर्पदंश झाल्यामुळे तिच्या कुटुंबातल्या सदस्यांनी तिला उपचारासाठी ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले, मात्र तिथे गेल्यानंतर दवाखान्याचे दरवाजे लावलेले होते असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. काही वेळानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्याने दरवाजा उघडला. त्यावेळी आम्ही मुलीला साप चावला असल्याचे त्यांना सांगितले.

त्यावेळी परिचारिकेने रुग्णालयातून डॉ. विशाल डुंबरे यांना फोन करून माहिती दिली. डुंबरे यांनी सदर मुलीला नागाचा दंश असल्याने तिला उपचारासाठी पुढे नारायणगाव येथे घेऊन जाण्यास फोनवरच सांगितले. त्यानंतर सदर चिमुरडीला नारायणगाव येथे नेले असता डॉक्टरनी मृत घोषित केले.

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल डुंबरे (Dr Vishal Dumbre) यांनी रुग्णालयत येऊन मुलीला तपासणी देखील केली नसल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी केली असून तिला जर वेळेत उपचार भेटले असते, तर ती वाचली असती असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

तरी सदर डॉक्टर वर कारवाई करण्याची मागणी मुलीची आई, आजी व आजोबा व इतर नातेवाईकांनी केली आहे.माजी जिल्हा परिषद सदस्य व आदिवासी नेते देवराम लांडे यांनी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सर्पदंश झालेल्या चिमूरडीच्या नातेवाईकांची भेट घेतली.

तसेच ओतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास उपचार करण्यासाठी टाळाटाळ का केली? याबाबत जाब विचारून, ओतूर येथील वैद्यकीय अधिकाऱ्याची वरिष्ठ अधिकाऱ्याकडे फोनद्वारे तक्रार केली आहे.

मनसे तालुकाध्यक्ष तानाजी तांबे म्हणाले की सदर घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच अशा घटना टाळण्यासाठी ओतूर ग्रामिण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी तांबे यांनी केली आहे.

ओतूर वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल डुंबरे म्हणाले, सोमवारी मध्यरात्री १:२४ वाजता मी कोर्टर मध्ये झोपलो
असताना मला दवाखान्यातून फोन आला की चार वर्ष वयाच्या मुलीला १२ वाजे दरम्यान नाग दंश झाला
असून तीला पिंपळगाव जोगा येथून आणले आहे आणि तीला उलटी ही झाली आहे.

कमी वय आणि आरोग्य केंद्रात व्हेंटीलेटरची सुविधा नसल्यामुळे मी फोनवरच त्याना पुढे उपचारासाठी
न्यावे लागणार असल्याचे सांगितले. तसेच मी हॉस्पिटल मध्ये येईपर्यंत सदर रुग्णाला घेऊन
नातेवाईक नारायणगावला गेले होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Pune Crime News | प्रेमात अडथळा ठरणार्‍या 13 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर वार करुन
केला खूनाचा प्रयत्न; फलटणहून मजनूला अटक, हडपसरमधील घटना

How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर

Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती

RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना

Infosys GST Evasion Issue | इन्फोसिसला आलेल्या जीएसटी नोटीसमुळे भडकले मोदी समर्थक उद्योगपती, म्हणाले – ‘हा टॅक्स टेररिझम…’

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले –
‘कुणाला संपवायचं असेल तर मनगटात दम लागतोय, घरात बसून…’

You may have missed