Kagal Assembly Constituency | मुश्रीफांविरोधात शरद पवारांचा डाव, फडणवीस-अजित पवारांना एकाचवेळी चेकमेट देणार?

Samarjit Ghatge-Hasan Mushrif

कोल्हापूर : Kagal Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election 2024) पुढील दोन ते तीन महिन्यात होतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. सर्वच पक्षांनी त्या दृष्टिकोनातून रणनीती आखत तयारी सुरु केलेली आहे. त्याचाच भाग म्हणून शरद पवारांनी (Sharad Pawar) कोल्हापूरच्या कागलमध्ये एकाचवेळी फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवारांना (Ajit Pawar) धक्का देण्याचा प्लॅन केल्याचे बोलले जात आहे.

अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन मुश्रीफांना (Hasan Mushrif) तगडा चेकमेट देण्यासाठी शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या समरजित घाटगेंनाच (Samarjit Ghatge) ऑफर दिल्याची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी आमदार सोबत घेऊन महायुतीत (Mahayuti) आपली चूल मांडली. दरम्यान सत्तेत सहभागी होत त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांनी सावध पावले टाकत लोकसभा निवडणुकीत मोठे यश खेचून आणले.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाची असमाधानकारक कामगिरी आणि शरद पवार गटाची सरशी यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार अत्यंत हुशारीने प्रत्येक चाल चालताना दिसत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरच्या कागल मतदारसंघावर शरद पवारांनी खास लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. कारण, तिथून लढण्यासाठी शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या समरजित घाटगे यांना गळ घातल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. याचाच अर्थ अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन मुश्रीफांना तगडा चेकमेट देण्याचा शरद पवारांचा डाव असल्याची चर्चा आहे.

समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ते म्हणाले , ” शरद पवार गटामध्ये तशी चर्चा सुरू आहे. मात्र, मी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
उमेदवारीबाबत सगळ्या चर्चा माध्यमांवरच बघत आहे”,
अशी प्रतिक्रिया समरजित घाटगे यांनी दिली. (Kagal Assembly Constituency)

एकीकडे समरजित घाटगेंनी भविष्यातील भूमिकेबाबत वक्तव्य केलेले नसले तरी हसन मुश्रीफ
यांनी मात्र निवडणूक कशीही झाली तरी आपणच आमदार होणार, असे वक्तव्य केले आहे.
कुणीही लढा, मी चिंता करत नाही, असेही ते म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर

You may have missed