Kaij Assembly Elections 2024 | भाजपा नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेत दिला शरद पवार गटाला पाठिंबा; राजकीय वर्तुळात चर्चा

Sangeeta Thombre-Sharad Pawar

केज : Kaij Assembly Elections 2024 | आज निवडणूक अर्ज मागे घेण्याची मुदत होती अनेक नेत्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे पाहायला मिळाले. ज्यांची नाराजी दूर झाली नाही ते बंडखोर मात्र अपक्ष म्हणून आता निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. त्यातच आता भाजप नेत्याने महायुतीला (Mahayuti) मोठा धक्का दिला आहे. बंडखोरी करत भरलेला अर्ज मागे घेतलेला असला तरी थेट शरद पवार गटाला (Sharad Pawar NCP) जाहीर पाठिंबा दिल्याची माहिती आहे.

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangeeta Thombre) यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र शरद पवार गटाला पाठिंबा दिल्याने महायुतीसाठी हा मोठा धक्का समजला जातोय. केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा (Namita Mundada) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. यानंतर भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी संगीता ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिला आहे. संगीता ठोंबरे यांच्या या निर्णयामुळे महायुतीचे टेन्शन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

२०१४ मध्ये संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक
लढवून विजय मिळवला होता. परंतु २०१९ च्या निवडणुकीत संगीता ठोंबरे यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने संगीता ठोंबरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवलं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed