Kalepadal Police News | गावठी दारुच्या 2 भट्ट्या उध्वस्त करुन 9 लाखांचा माल हस्तगत; तब्बल 4340 लिटर गावठी दारु आणि 12 हजार लिटर कच्चे रसायन पकडले
पुणे : Kalepadal Police News | वडाचीवाडी (Wadachi Wadi) येथील औताडवाडी (Autadwadi Handewadi) आणि ओढ्यालगत दोन ठिकाणी असलेल्या गावठी दारुच्या दोन भट्ट्या (Gavti Daru Bhatti) काळेपडळ पोलिसांनी उध्वस्त केल्या. या ठिकाणांहून पोलिसांनी तयार हातभट्टीच्या दारुने भरलेले १२४ कॅन व १२ हजार लिटर कच्चे रसायन असा ९ लाख २७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
काळेपडळ पोलीस ठाण्यातील तपास पथक पेट्रोल करीत असताना पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे यांना बातमी मिळाली की, वडाची वाडी येथील औताडवाडी स्मशान भूमीच्या जवळ, ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारु काढण्याचे काम सुरु आहे. या बातमीची खातरजमा केल्यानंतर दोन्ही ठिकाणी सापळा रचून हातभट्टीवर छापा टाकला. त्या ठिकाणी दारु गाळणारे जगदीश भैरुलाल प्रजापती (वय २४, रा. काळेपडळ, हडपसर), गुलाब संपकाळ रजपुत (वय ३३, रा. पिंजनवस्ती, होळकरवाडी) यांना पकडण्यात आले. तेथे गावठी दारु काढण्यासाठी लागणारे साहित्य, दारू काढण्याची भट्टी लावून गावठी हातभट्टी गाळण्याचे काम सुरु होते. याबाबत पोलिसांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर, पोलीस हवालदार परशुराम पिसे, संजय देसाई, पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने केली आहे. (Kalepadal Police News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Daund Leopard Attack | पुणे / दौंड: बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण
Ozar Pune Accident News | पुणे : मोटारसायकल आणि कारच्या धडकेत एकाचा दुर्दैवी मृत्यू;
अपघातानंतर कार चालकाने पळ काढला