Kalepadal Police Station News | काळेपडळमधील संतोषनगर येथे दारुच्या भट्टीवर छापा ! पावणे नऊ लाखांची गावठी दारु हस्तगत

पिंपरी : Kalepadal Police Station News | काळेपडळ येथील संतोषनगरमधील (Santosh Nagar Kalepadal) कंजारभट येथे दारुची भट्टी (Kanjarbhat Daru Bhatti) उभारुन दारु गाळण्याचे काम सुरु असल्याचे आढळून आले. काळेपडळ पोलिसांनी ही भट्टी उद्धवस्त करुन ८ लाख ७२ हजार रुपयांची ३०४५ लिटर गावठी दारु, तिची वाहतूक करणार्यासाठी वापरली जाणारी कार असा माल जप्त केला आहे.
हातभट्टी चालविणारे सतिश प्रकाश कचरावत (वय ४२), मानेश प्रकाश कचरावत (वय ३५, दोघे रा. संतोषनगर, कंजारभट वस्ती, महंमदवाडी रोड) यांना पकडले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेपडळ तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे गस्त घालत असताना पोलीस अंमलदार महादेव शिंदे यांना बातमी मिळाली की, संतोषनगर, कंजारभट येथे सचिन कचरावत व मानेशा कचरावत हे दोघे मिळून त्यांच्या राहत्या घरामागे गावठी हातभट्टी दारु काढण्यासाठी लागणारे साहित्य गोळा करुन दारु काढण्याची भट्टी लावून दारु गाळण्याचे काम करीत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हातभट्टीवर छापा मारुन दोघांना पकडले. त्यांच्याकडून दारुने भरलेले एकूण ८७ कॅन व चार चाकी स्विफ्ट कार असा ८ लाख ७२ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,
अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सुचनेनुसार,
सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, प्रशांत लटपटे,
पोलीस हवालदार संजय देसाई, दाऊद सय्यद, परशुराम पिसे, अमोल काटकर, पोलीस अंमलदार नाईक,
स्रेहल जाधव, महादेव शिंदे, अतुल पंधरकर, सद्दाम तांबोळी, गणेश माने, श्रीकृष्ण खोकले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण