Kalepadal Pune Crime News | पुणे: अत्याचार करुन जातीवाचक शिवीगाळ, तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Molestation

पुणे : Kalepadal Pune Crime News | तुझ्यासोबत मी लग्न करतो असे सांगून महिलेवर वारंवार अत्याचार केले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर तिला जातीवाचक शिवागाळ करुन मारहाण केली. तसेच मुलाला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली. याप्रकरणी 26 वर्षीय तरुणावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2019 ते जून 2024 या कालावधीत काळेपडळ, बोराडे नगर (Borade Nagar Kalepadal) परिसरात घडला आहे.

याबाबत 40 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन रामेश्वर यशवंत आयनुले Rameshwar Yashwant Ayanule (वय-26 रा. मु.पो. नागदरवाडी, ता. चाकुर जि. लातुर) याच्याविरुद्ध आयपीसी 376, 376/2/एन, 506 सह सह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेसोबत ओळख करुन तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. पीडितेने लग्नाबाबत तगादा लावला असता आरोपी रामेश्वर याने जातीवाचक शिवीगाळ करुन लग्न करण्यास नकार दिला.

तसेच तिला धमकावले. आरोपीच्या भीतीने व सततच्या भांडणामुळे महिलेने अनेकवेळा घर बदलले.
मात्र, आरोपी महिलेचा शोध घेऊन त्याठिकाणी येऊन तिला मारहाण करत होता.
आरोपीने महिलेच्या घरी येऊन तिला व तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी
दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा

Anant-Radhika Wedding | सोनिया गांधी, राहुल… कोणा-कोणाला मुकेश अंबानी यांनी दिले निमंत्रण, ही आहे गेस्ट लिस्ट

You may have missed