Kalmodi Dam | कळमोडी धरण 100 टक्के भरले; सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदीत

Kalmodi Dam

खेड : Kalmodi Dam | खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कळमोडी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदीपात्रात होण्यास सुरुवात झाली आहे. मागील वर्षी हे धरण १७ जुलै रोजी शंभर टक्के भरले होते मात्र यंदा चार दिवस उशिरा म्हणजे २१ जुलै रोजी भरले आहे.

चास कमान धरणाच्या पाण्यापासून वंचित राहिलेल्या खेड तालुक्यातील गावांसह आंबेगाव तालुक्याच्या सातगाव पठार भागात वरदान ठरणारे हे धरण आज पुर्ण क्षमतेने भरताच धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरूवात झाली.

या धरणात २०१० पासून पुर्ण क्षमतेने पाणीसाठा होण्यास सुरूवात झाली असून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणास कोणत्याही प्रकारचे दरवाजे नसून धरण भरताच सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते.

कळमोडी धरण परिसरात पावसाचा जोर गेली काही दिवसांपासून कमी जास्त होत होता, धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाव व परिसरात पावसाचा जोर बऱ्यापैकी राहिल्याने धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन धरण शंभर टक्के भरले आहे.

धरणाच्या सांडव्यावरून ३२ कयुसेक्स वेगाने पाणी आरळा नदिपात्रात विसर्ग होत
असून पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वेगाने होणार असल्याने नदिकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला
असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. धरण पातळीवर उप विभागीय अभियंता डी. एस. डिग्गीकर,
सहाय्यक अभियंता एस. एस. सुसुंद्रे, कर्मचारी रोहिदास नाईकडे, संभाजी बोंबले, शांताराम सातपुते चोवीस तास लक्ष ठेवून आहेत.

धरणात ४२.८७ द.ल.घ.मी. म्हणजेच १.५१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
धरण परिसरात एक जुनपासून ४४६ मीमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
कळमोडी धरण भरल्याने या धरणातून बाहेर पडणारे पाणी चास कमान धरणात
येत असल्याने चास कमान धरणातील पाणीसाठा वेगाने वाढण्यास मदत होणार आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar On Pink Colour Dress Jacket | पिंक पॉलिटिक्स वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; गुलाबी रंगाच्या जॅकेटबाबत म्हणाले,… (Video)

Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत

Dandekar Pool Pune Crime News | पुणे: अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करुन असभ्य वर्तन, 40 वर्षीय नराधमाला अटक