Kalpana Ambadas Pawar | कडक सलाम ! मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस शिपायाची पत्नी थेट पोलीस उपअधीक्षक; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश प्रदान

मुंबई: Kalpana Ambadas Pawar | २६/११ हल्ल्यात पोलीस शिपाई अंबादास पवार शहीद झाले होते. त्यांच्या पत्नी कल्पना पवार यांची महाराष्ट्र सरकारने थेट पोलीस उपअधीक्षकपदी निवड केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कल्पना पवार यांना नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडियावरून माहिती दिली आहे. (DySP Kalpana Pawar)
https://twitter.com/CMOMaharashtra/status/1914609399932576195/photo/1
शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना नियुक्तीपत्र देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना शहीद पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेली शासनाची कृतज्ञता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून दाखवल्याचे ‘सीएमओ’ ने पोस्टमध्ये म्हटले आहे.
नियुक्तीचे आदेश मिळाल्यानंतर कल्पना पवार म्हणाल्या, ” माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे, हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”