Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर अपघात प्रकरणी बाल न्याय मंडळातील 2 सदस्यांवर कारवाईची शिफारस

Kalyani Nagar Car Accident Pune

पुणे : Kalyani Nagar Car Accident Pune | कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात होऊन भरधाव कारच्या धडकेत संगणक अभियंता तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात बांधकाम व्यावसाायिक विशाल अगरवाल (Vishal Agarwal Builder) याच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर १५ तासांत मुलाला बाल न्याय मंडळाने (Juvenile Justice Board – JJB) जामीन मंजूर केला होता.

वाहतूक प्रश्नावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा, वाहतूक पोलिसांसोबत १५ दिवस चौकात वाहतूक नियोजन करावे, तसेच व्यसनमुक्तीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात यावे, अशा अटी-शर्तींवर मुलाचा जामीन मंजूर करण्यात आला होता. या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. (Kalyani Nagar Car Accident Pune)

त्यानंतर आता जामीन मंजूर करणाऱ्या बाल न्याय मंडळातील दोन अशासकीय सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस महिला आणि बाल कल्याण आयुक्तांनी केली आहे.
बाल न्याय मंडळाच्या सदस्यांनी दिलेल्या निर्णयाची चौकशी करण्यासाठी महिला आणि बाल कल्याण विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीने शंभरहून अधिक पानांचा अहवाल बाल कल्याण विभागाकडे नुकताच सादर केला.
मुलाला जामीन मंजूर करण्याच्या प्रक्रियेत सदस्यांनी पुष्कळ चुका केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते.
संबंधित अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Raut On Sharad Pawar | “शरद पवार हे देशाच्या राजकारणातील नटसम्राट तर भुजबळ हे…”; संजय राऊतांचा निशाणा

Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…

Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्रांच्या आधारे रानडे चॅरिटी ट्रस्टची जमीन बळकावली, तीन जणांवर गुन्हा दाखल

You may have missed