Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | पोर्शे कार प्रकरणातील आजोबा सुरेंद्रकुमार अगरवालवर आणखी एक गुन्हा दाखल

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune

पुणे : Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाच्या कार अपघातातील अगरवाल कुटुंबाचे एक एक कारनामे अजूनही सुरु असल्याचे दिसून येत आहेत. जामिनावर सुटल्यानंतर सुरेंद्र कुमार अगरवाल (Surendra Kumar Agarwal) याने पुन्हा एकदा एकाला जीवे मारुन टाकण्याची धमकी (Death Threats) दिली असून ऑफिसला बोलावून त्याला डांबून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी विद्यासागर सेल्वराज सिंगाराम (वय ३७, मोजेसवाडी वडगाव शेरी) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरेंद्र कुमार अगरवाल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ब्रम्हा मल्टीकोन प्रा. लि. चे (Brahma Multicon Pvt. Ltd.) एम जी रोड ऑफिसमध्ये शुक्रवारी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेंद्र कुमार अगरवाल याने फिर्यादी यांना त्यांच्या ब्रम्हा मल्टीकोन कार्यालयात बोलावून घेतले. त्याचे कंपनीचा ओरीजनल बाऊन्स झालेला चेक घेऊन जा, असे सांगितले. फिर्यादी तेथे गेल्यावर तुमचा चेक सापडत नाह. तेव्हा फिंर्यादी यांनी कंपनीचे संचालक रुस्तम भरुचा यांना कळविले. चेक सापडत नसेल तर त्याच्या हस्ताक्षरात लिहून घ्या, जेव्हा त्यांना चेक भेटेल, तेव्हा ते आम्हाला परत देतील व सदरचा ते चेकचा दुरुपयोग करणार नाही, असे लिहून घेण्यास भरुचा यांनी फिर्यादी यांना सांगितले.

त्यांनी तसे लिहून दिले व त्याचे कामगारास या पत्राचे सेटलमेंट अ‍ँग्रीमेंट झेरॉक्स घेऊन ठेव, असे म्हणून आरोपी अगरवाल तेथून निघून गेला.
थोड्या वेळात परत आरोपीने कामगाराला फोन करुन सांगितले की, ओरीजनक कागदपत्रे त्याला देऊ नका,
नंतर आरोपीनी तेथे येऊन फिर्यादीस शिवीगाळ केली.
ओरीजनल सेटलमेंट अँग्रीमेट डी डी दुय्यम पत्र व लेटर फाडून टाकून तो म्हणाला की, तुला जीवे मारुन टाकतो,
अशी धमकी दिली. फिर्यादीस बसवून तेथून बाहेर जाऊ नको, असे म्हणून अडवून ठेवले.
तेव्हा फिर्यादी यांनी घाबरुन त्यांचे साथीदारांना बोलावून घेतले. तेव्हा त्याने तिवारी आल्यावर पाहु असे म्हणून फिर्यादी
यांना ऑफिस बाहेर येऊन अश्लिल शिवीगाळ करुन हाकलून दिले़ पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत. (Kalyani Nagar Porsche Car Accident Pune)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद