Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | पॉर्शे कार अपघात प्रकरणात रक्त नमुने बदल करण्यास मदत करणारे आणखी दोघांना अटक

Swapping-Teens-Blood-Sample

पुणे : Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदल करण्यासाठी (Blood Sample Tampering Case Pune) बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Builder Vishal Agarwal) यांना मदत केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोघांना अटक केली आहे.

आदित्य अविनाश सूद Aditya Avinash Sood (वय ५२) आणि आशिष सतीश मित्तल Ashish Satish Mittal (वय ३६) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही ससूनमधील (Sassoon Hospital) डॉ. अजय तावरेच्या (Dr Ajay Taware) संपर्कात असल्याचे तपासात उघड झाले.

कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री हा अपघात झाला होता. भरधाव मोटारीच्या धडकेने संगणक अभियंता तरुण तरुणीचा मृत्यु झाला होता. अपघानंतर अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अगरवाल यांनी ससूनमधील डॉ. तावरेशाी संपर्क साधला होता. त्यासाठी मकानदार व गायकवाड यांच्या माध्यमातून चार लाख रुपये देण्यात आले होते. अगरवाल यांचे परिचित आदित्य सुद आणि आशिष मित्तल यांची डॉ. तावरे याच्याशी ओळख होती.

त्यांच्या माध्यमातून अगरवाल यांनी डॉ. तावरे याच्याशी संपर्क साधल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर गुन्हे शाखेने सोमवारी रात्री उशीरा सुद आणि मित्तल यांना अटक केली.
दोघांना आज दुपारी न्यायालयात हजर करुन अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

Shivsena Eknath Shinde Vs NCP Ajit Pawar | “राष्ट्रवादी हा विश्वासघातकी पक्ष” शिंदे गटाच्या आमदाराची टीका; महायुतीत कलगीतुरा रंगला

Amol Balwadkar Foundation | कोथरूडकर वहिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा! मंगळागौर, पैठणीच्या खेळाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या उपक्रमाने भगिनी गहिवरल्या

Amol Balwadkar Foundation | धागा मायेचा, वीण विश्वासाची…! अमोल बालवडकर यांना हजारो महिलांनी बांधली राखी; अमोल बालवडकर फाउंडेशनच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन

Congress Mohan Joshi | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा; अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed