Kannad Assembly Election 2024 | भाजपच्या माजी मंत्र्याची मुलगी माजी आमदार पतीविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात? शिवसेना शिंदे गटात प्रवेशाच्या हालचाली

छ. संभाजीनगर : Kannad Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर अनेकजण पक्ष बदलताना दिसत आहेत. ज्या पक्षातून उमेदवारी मिळणे सोयीस्कर आहे अशा ठिकाणी नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. आता भाजप नेते (BJP Leader) आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Shivsena Shinde Group)
संजना जाधव ह्या माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्या पत्नी आहेत. मात्र, सध्या त्या विभक्त राहात आहेत. त्यांचे पती ज्या मतदार संघातून आमदार होते त्या कन्नड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची दाट शक्यता आहे.
हा मतदार संघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेला आहे. त्यामुळे संजना जाधव शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. संजना जाधव या माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना घरातूनच राजकीय वारसा लाभला आहे.
कन्नड विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी हर्षवर्धन जाधव यांचा बालेकिल्ला राहिला आहे. ते या मतदार संघातून निवडून ही आले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला होता.
त्यांच्या पत्नी संजना जाधव यांचीही राजकीय महत्वकांक्षा लपून राहिलेली नाही.
हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव त्याच्यात वाद होते. त्यामुळे ते दोघेही विभक्त राहात आहेत.
संजना जाधव या कन्नड विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार म्हणून रिंगणात असतील.
संजना या मैदानात असल्यास इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त
Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)
Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर
Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण