Karjat Jamkhed Assembly Election 2024 | कर्जत जामखेडमधून शरद पवारांचे टीकास्त्र; म्हणाले – “राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले?

Sharad Pawar-Ram Shinde

कर्जत: Karjat Jamkhed Assembly Election 2024 | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे (MVA Candidate) उमेदवार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या प्रचार सभेतून बोलताना शरद पवार यांनी राम शिंदेंवर (Ram Shinde) हल्लाबोल केला आहे. ” या तालुक्याला १० वर्ष एक आमदार होता, मंत्री होता, सत्ता हातात होती, त्यांनी १० वर्ष काय दिवे लावले?”, असे म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी निशाणा साधला आहे.

शरद पवार म्हणाले, ” कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामाकडे रोहित पवारांचे लक्ष आहे. या तालुक्याला १० वर्ष एक आमदार होता, मंत्री होता, सत्ता हातात होती त्यांनी काय केलं १० वर्ष? मी मागे चौंडीत आलो, तिथे एक टोलेजंग बंगला बांधण्यात आलाय. मी विचार केला की, हा भाग तर दुष्काळी भाग आहे, तर हा बंगला कुणाचा असा प्रश्न मला पडला”, असं म्हणत शरद पवारांकडून राम शिंदे यांच्या चौंडीतील घरावरून टीका करण्यात आली.

ते पुढे म्हणाले, ” त्यांनी लोकांचा विकास केला नाही. स्वतःच्याच तुंबड्या भरल्यात. या मतदारसंघात विकास करायचा असेल तर या मतदारसंघात एमआयडीसी व्हायला हवी. २० तारीख ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. राज्याचा कारभार कुणाच्या हातात द्यायचा त्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे”, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई

Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध

Policeman Suicide News | तणावग्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ

Maharashtra Assembly Election 2024 | मतदानासाठी मतदार ओळखपत्र नसल्यास ‘हे’ 12 प्रकारचे पुरावे ग्राह्य; मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी

Indapur Assembly Election 2024 | ‘दत्तात्रय भरणे सारख्या गद्दाराला पाडण्यासाठी पूर्ण ताकतीने काम करा’, जयंत पाटील यांचे इंदापूरमध्ये आवाहन

You may have missed