Karjat Jamkhed Constituency | ‘अजित पवारांवर भाजपचा दबाव’; रोहित पवार म्हणाले – ‘जे बारामतीत झाले, तेच कर्जत-जामखेडमध्ये…’

Rohit Pawar-Ajit Pawar

कर्जत : Karjat Jamkhed Constituency | कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीप्रमाणेच पुन्हा एकदा दोन पवारांमध्ये संघर्ष होणार आहे आणि त्यासाठी भाजपमधून (BJP) अजित पवार (Ajit Pawar NCP) यांच्यावर दबाव आणण्यात येत आहे, असे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या ‘एक्स’ पोस्टवर म्हंटल्याने राजकीय वर्तुळात चर्चा चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवार म्हणाले, सुप्रियाताईंच्या (Supriya Sule) विरोधात सुनेत्राकाकींना (Sunetra Ajit Pawar) उमेदवारी देण्याचा निर्णय दादांचा असू शकत नाही ही आम्हाला खात्री होती. दादांनी आता ते कबूल केले आहे. मात्र मित्रपक्ष हा दादांचाच निर्णय असल्याचे सांगत आहे.

आपण चूक झाल्याचं नाव देत असलो तरी प्रत्यक्षात हा दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्याचा दबाव होता आणि आता विधानसभेला असाच दबाव माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत आपल्यावर आणला आहे, अशीदेखील चर्चा आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Karjat Jamkhed Constituency)

ते पुढे म्हणाले, दबावाला बळी पडणे हा वैयक्तिक विषय असला तरी स्वाभिमान विचारधारा आणि
साहेबांना सोडून तुम्ही भाजपाचे मांडलिकत्व स्वीकारलं आणि त्यामध्ये एक क्षमता असलेला नेता बळीचा बकरा ठरला
याचं मात्र पक्षाचा एक कार्यकर्ता आणि एक तुमचा पुतण्या म्हणून कायम दुःख राहील, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

पण, ही कट-कारस्थाने करणाऱ्या, तसेच महाराष्ट्र नासवणाऱ्या त्या कलाकाराला
मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेच्या सहकार्याने राज्यातील राजकीय पटलावरून एक दिवस नक्कीच बाजूला सारेन,
असा माझा तुम्हाला पक्का वादा आहे, असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडे पुण्यातील 8 मतदारसंघातून 24 इच्छुकांचे अर्ज; काँग्रेसची महत्वकांक्षा वाढली

ACP Satish Govekar | सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पोलीस पदक जाहीर

Maharashtra DCP / SP Transfers | शिरीष सरदेशपांडे यांची पुणे एसीबीच्या अधीक्षकपदी नियुक्ती; राज्यातील 30 पोलीस उपायुक्त, अधीक्षकांच्या बदल्या

You may have missed