Karve Nagar Pune Crime News | पुणे: मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बारमध्ये घुसून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न ! कर्वेनगरमधील चंद्रलोक बियर बारमधील घटना
पुणे: Karve Nagar Pune Crime News | मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने बियर बारमध्ये शिरुन चार जणांवर कोयता (Koyta Attack), अॅल्युमिनियम पाईप, पेव्हिंग ब्लॉकने मारहाण केली. त्यात दोघे बेशुद्ध पडले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. (Attempt To Murder)
प्रतिक भोकरे (वय ३३) आणि रोहित रहाटे (वय १८) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत नितीन रुपंचद जमादार (वय २८, रा. वडगाव बुद्रुक) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रवी जाधव, यश घोलप, बारक्या लोणारे व त्यांच्या १४ ते १५ साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Karve Nagar Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे वर्षभरापूर्वी शुभम ऊफाळे याच्या मित्राने रवी जाधव व यश घोलप, बारक्या लोणारे यांचा मित्र ओंकार लोहकरे याचा खुन केला होता. त्याचा बदला घेण्याची रवी जाधव वाट पहात होता. फिर्यादी हा कॅब चालक आहे. तो व त्याचा मित्र शुभम ऊफाळे हे चंद्रलोक बियर बारमध्ये बिअर पिण्यासाठी गेले होते. ऊफाळे याचा मित्र रोहित रहाटे व खंडू म्हेत्रे यांना बोलावून घेतले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रतिक भोकरे हाही आला. त्याने सांगितले की, बाहेर रवी जाधव व त्याचे साथीदार आले आहेत. बाहेर कुणी जाऊ नका. शुभम याने त्याच्यासोबत असलेल्या मुलांना बाहेर जाऊन रवी जाधवची पोरं कोण आहे, हे पाहायला पाठविले. फिर्यादी हे बाहेर जात असतानाच रवी जाधव व त्याचे साथीदार बारमध्ये शिरले. त्यांनी कोयत्याने जो सापडेल त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.
त्यात शुभम ऊफाळे हा पळून गेला. फिर्यादीने त्याच्यावरील वार हातावर झेलले. त्याच्या दोन्ही हातावर डाव्या कानावर कोयत्याने वार करुन जखमी केले. इतरांनी प्रतिक भोकरे याच्या डोक्यात, पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. रोहित रहाटे याच्या डोक्यात कोयता, अॅल्युमिनियम पाईप, पेव्हिंग ब्लॉकने मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रवी जाधव व त्याच्या मुलांनी धारदार शस्त्रे हवेत फिरवून कोण भाई आमच्यामध्ये येतो, सगळीकडे आमचीच दहशत, आमच्यामध्ये कोण आलं तर त्याला पण खलास करुन टाकू असे म्हणून जोरजोरात आरडा ओरडा करत धमकी देऊन ते निघून गेले.
हॉटेलच्या वेटरने रिक्षा आणली. त्यात फिर्यादी बसले. रिक्षामध्येच फिर्यादी बेशुद्ध पडले. त्यानंतर सर्वांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. प्रतिक भोकरे, रोहित रहाटे दोघेही बेशुद्ध असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. फिर्यादी यांना हॉस्पिटलमधून सोडल्यावर त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक बडाख तपास करीत आहेत.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Rural Police News | रांजणगाव एमआयडीसीत आश्रय घेतलेल्या 21 बांगलादेशी नागरिकांना अटक;
बांगला देशींकडे आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्डही (Video)