Kasarde Sindhudurg Accident News | पिकअप-दुचाकीच्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू
सिंधुदुर्ग : Kasarde Sindhudurg Accident News | दाभोली-हळदणकरवाडी येथील भवानी मंदिरासमोर महिंद्रा बोलेरो पिकअप आणि इलेक्ट्रिक बाईक यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दिनेश विजय भोगले (वय -३४, मूळ रा. कासार्डे, ता. कणकवली, सध्या रा. वेंगुर्ले) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. शनिवार (दि.२१) दुपारी एक वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
या घटनेची फिर्याद प्रवीण रामचंद्र शिंद (रा. वेंगुर्ले – सुंदरभाटले) यांनी वेंगुर्ले पोलीस स्थानकात दिली. दाखल फिर्यादीनुसार भरधाव वेगाने वाहन चालवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पिकअप चालक प्रमोद ज्ञानेश्वर सावळ (वय-३२, रा. आडेली- पेडणेकरवाडी) याच्या विरोधात वेंगुर्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद सावळ महिंद्रा बोलेरो पिकअप घेऊन वेतोरे येथून वेंगुर्लेच्या दिशेने येत होते. दिनेश भोगले वेंगुर्ले हून इलेक्ट्रिक दुचाकीवरून वेतोरेकडे जात होता. दाभोली येथील तीव्र वळण व उतारावर या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दिनेश भोगले याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनला
या दुर्घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पीएसआय ज्ञानेश्वर गवारी,
सहा. उपनिरीक्षक संदेश कुबल, हवालदार भगवान चव्हाण, हवालदार प्रथमेश पालकर आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ज्ञानेश्वर गवारी पुढील तपास करत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत