Kasarsai Dam | कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव
पुणे : Kasarsai Dam | मागील काही दिवसांपासून पर्यटनासाठी गेलेले पर्यटक पाण्यात वाहून जाण्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) थेरगाव येथे एम. एम. कॉलेज (MM College Thergaon) आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पाच विद्यार्थांनी कॉलेजला दांडी मारून कासारसाई धरणावर फिरायला जाण्याचा प्लॅन केला. (Kasarsai Dam)
याबाबतची माहिती त्यांच्या पालकांना होती ना शिक्षकांना होती. हे पाचही जण धरण परिसरात पोहोचले. तिथे त्यांनी मजा करायला सुरूवात केली. शिवाय त्यात त्यांना धरणाच्या पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही.
त्यानंतर ते पाचही जण धरणाच्या पाण्यात उतरले. ते पाण्यामध्ये खेळण्यात दंग होते. खेळता खेळता त्यातील एकजण खोल पाण्यात गेला. तिथे त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. तो काही क्षणातच पाण्यात वाहून गेला. त्यावेळी इतर चार मित्रांनी आरडा-ओरडा केला. त्यानंतर गावातील नागरिकांनी शिरगाव परंदवाडी पोलिसांना तात्काळ या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ, तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला
याबाबतची माहिती कळवली. रेस्क्यू टीमने काही वेळातच या विद्यार्थ्यांला शोधून काढले.
पण खूप उशीर झाला होता. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह रेस्क्यू टिमने बाहेर काढला. सारंग रामचंद्र डोळसे (वय १७) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sharad Pawar NCP | ‘ज्यांनी आमचं काम केलं ते आमचे’ अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके
यांच्या भेटीनंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य चर्चेत