Kasba Assembly Constituency | कसबा मतदारसंघात ब्राह्मण समाजाच्या प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर; भाजपची डोकेदुखी वाढणार?

BJP

पुणे: Kasba Assembly Constituency | राज्यातील धर्म, जात आणि पंथ अशा सर्वच आघाड्यांवर यंदाची विधानसभा निवडणूक गाजण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) ब्राह्मण समाजाच्या (Brahmin Samaj) प्रतिनिधित्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची आणि त्यातून भारतीय जनता पक्षही अडचणीत येऊ शकतो. (Kasba Assembly Constituency)

कसबा विधानसभा मतदारसंघातून ब्राह्मण समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी विविध ब्राह्मण संस्था-संघटनांनी केली आहे. क्षीण झालेला ‘हिंदुत्वा’चा आवाज मजबूत करण्यासाठी ब्राह्मण समाजाला उमेदवारी मागण्यात आल्याचे संघटनांनी म्हटले आहे.

दीड वर्षांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व न दिल्याने ब्राह्मण समाज नाराज झाला होता. पोटनिवडणुकीत भाजपला हक्काच्या मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अद्यापही उमेदवारांच्या नावांची घोषणा झालेली नाही. मात्र, त्यापूर्वीच ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, या आग्रही मागणीने जोर धरला आहे.

भाजप (BJP) आणि शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) या दोन्ही पक्षांनी कायम हिंदुत्वाची कास धरून सर्वसमावेशक धोरण अवलंबताना ब्राह्मण समाजाला प्राधान्य दिले आहे. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचीही घोषणा झाली आहे. त्यामुळे राज्यातील ब्राह्मणबहुल किमान ३० विधानसभा मतदारसंघांत ब्राह्मण समाजाला उमेदवारी द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, ” कसबा विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण समाजाची मोठी संख्या
आणि ताकद आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघातील उमेदवारी देताना ब्राह्मण समाजातील व्यक्तीलाच द्यावी.
यापूर्वी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व दिवंगत आमदार गिरीश बापट (Girish Bapat),
मुक्ता टिळक (Mukta Tilak), अण्णा जोशी (Anna Joshi), डॉ. अरविंद लेले (Dr Arvind Lele)
यांनी केले आहे. त्याची दखल विशेषत: भाजपने घ्यावी. ब्राह्मण समाजाने कायमच भाजपला साथ दिली आहे, ही बाब लक्षात घेऊन या मागणीचा विचार व्हावा “, असे कुलकर्णी यांनी म्हंटले आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed