Kasba Assembly Election 2024 | कसबा मतदारसंघात यंदा ‘हे’ 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; जनता कोणाला कौल देणार?

Kasba Peth Assembly

पुणे: Kasba Assembly Election 2024 | महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. मागील काही वर्षात राज्याच्या राजकीय समीकरणात झालेल्या बदलामुळे स्थानिक राजकारणातही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत राहिलेला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघामधून काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत आता कसबा विधानसभा मतदारसंघातील जनता कोणाला कौल देते? महायुतीला की महाविकास आघाडीला? की अजून इतर कोणत्या पक्षाला? हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.

दरम्यान यंदा विधानसभेसाठी कसबा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामध्ये गणेश भोकरे- मनसे , हेमंत रासने-भाजप, ऍड. ओंकार येनपुरे-महाराष्ट्र स्वराज्य पार्टी, हुसेन नसरुद्दीन शेख- अपक्ष, अरविंद अण्णासो वालेकर- सनय छत्रपती शासन, शैलेश रमेश काची- राष्ट्रीय समाज पक्ष, प्रफुल्ल सोमनाथ गुजर- वंचित बहुजन आघाडी, कमल ज्ञानराज व्यवहारे-अपक्ष, सुरेशकुमार बाबुराव ओसवाल-अपक्ष, गणेश सीताराम बढाई-अपक्ष, रवींद्र हेमराज धंगेकर-काँग्रेस, सय्यद सलीम बाबा- बहुजन समाज पार्टी (आंबेडकर) यांचा समावेश आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीतील आकडेवारीनुसार,
एकूण २,९०,४८४ पात्र मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या १,४४,०३४ तर
महिला मतदारांची संख्या १,४६,४४६ एवढी आहे. आता या आकडेवारीत बदल झालेला असू शकतो.
दरम्यान आता कसबा विधानसभा मतदारसंघात २३ नोव्हेंबरला गुलाल कोण उधळणार?
याची उत्सुकता आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Rashmi Shukla | राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवलं; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Assembly Election 2024 | ‘उमेदवार द्यायचा नाही आता कोणाला पाडायचं ते पाडा’, मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; म्हणाले – ‘गनिमी काव्याने समाजाची ताकद दाखवू’

Pune Politics News | इच्छुकांची नाराजी दूर झाली पण त्यांच्यासाठी जीव तोडून काम करणारे कार्यकर्ते अद्याप संतप्तच?

Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Devendra Fadnavis On Jayant Patil | “सिंचन घोटाळ्यावरून फडणवीसांनी अजित पवारांना ब्लॅकमेल केलं”, जयंत पाटलांचा मोठा आरोप, फडणवीस म्हणाले,…

You may have missed