Kasba Peth Assembly Election 2024 | “आमदार म्हणून कसब्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी झटत राहील”, रवींद्र धंगेकरांकडून आश्वासन, पदयात्रेसाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित

Ravindra Dhangekar

पुणे: Kasba Peth Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली आहे. २० नोव्हेंबरला मतदान असणार आहे. त्यामुळे पुढील एक आठवडाच प्रचारासाठी उरलेला आहे. शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे हेमंत रासने (Hemant Rasane) या दोघांमध्ये मुख्यतः लढत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान (दि.८) कसबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्र.१७ रविवार पेठ, रास्ता पेठ आयोजित पदयात्रेसाठी काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) उपस्थित होते. मतदारसंघात पुन्हा एकदा धंगेकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन यावेळी थोरात यांनी केले.

रवींद्र धंगेकर म्हणाले,” सर्वसामान्य कष्टकरी व मध्यमवर्गीयांचा आवाज म्हणून महाविकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आजवर नेहमी सर्व समावेशक पद्धतीने विकासाचे धोरण राबवत आला आहे. या पुढील काळात देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कसबा विधानसभेचा आमदार म्हणून कसब्याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी झटत राहील, असे आश्वासन धंगेकर यांनी दिले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत कसबा विधानसभा मतदारसंघात मविआची भव्य रॅली, रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | ‘तू तू ,मैं मैं’ ची लढाई करणार नाही ,पण चोख प्रत्यत्तर देऊ – सुप्रिया सुळे (Video)

Sunil Shelke MLA | अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ, शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Shivaji Nagar Assembly | सुरक्षा आणि वाहतूक कोंडी सोडविण्यात शिवाजीनगरमधील आमदार, नगरसेवकांना आले अपयश

Parvati Assembly Election 2024 | ‘मतदारसंघातील जनता विजयाची तुतारी वाजवणारच’, अश्विनी कदम
यांचा विश्वास, पदयात्रेत महिलांचा लक्षणीय सहभाग

You may have missed